NDCC Bank, Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics : नाशिक जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्मचाऱ्यांचे साकडे !

CM Devendra fadnavis on Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेवर राज्य सहकारी बँकेचा संस्थात्मक प्रशासक नियुक्तीची मागणी.

Sampat Devgire

NDCC Bank News : नाशिक जिल्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दत्तक घेतला होता. नाशिक जिल्हा बँक सध्या अडचणीत आहे. या बँकेचा बँकिंग परवाना रद्द होण्याची टांगती तलवार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्हा सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेचा संस्थात्मक प्रशासक नियुक्त केला आहे. हा एक वेगळा प्रयोग आहे. संस्थात्मक प्रशासक नियुक्त केल्याने बँकेला राज्य सहकारी बँकेकडून अर्थसहाय्य उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याचबरोबर बँकेचे तज्ञ अधिकारी जिल्हा बँकेवर देखरेख करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या जिल्हा बँकेत आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. बँकेची 2200 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या वसुलीसाठी प्रशासक आणि कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत मात्र हे प्रयत्न पुरेसे नाहीत. त्याला राज्य शासनाने मदत करावी अशी विनंती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव आणि सचिव प्रदीप शेवाळे यांनी केली आहे.

या संदर्भात जिल्हा बँकेच्या कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नागपूर जिल्हा बँकेबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे या श्रेष्ठ मंडळांनी कौतुक केले. या प्रयत्नामुळे बँक आर्थिक संकटातून बाहेर पडेल असा विश्वास व्यक्त केला.

जिल्हा बँकेकडे 2200 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या बँकेला साडेसातशे कोटी रुपयांची मदत आवश्यक आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांकडे यापूर्वी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह काही लोकप्रतिनिधींची बैठक झाली होती. त्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे सूचित करण्यात आले होते मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या जिल्हा बँकेवरही राज्य सहकारी बँकेचा संस्थात्मक प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा बँकेवर बँकिंग लायसन्स रद्द होण्याची टांगती तलवार आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा बँकेला वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याच्या आश्वासन जिल्हा बँक कर्मचारी संघटनेला दिले. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांसह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT