Police News; मेल द्वारे बॉम्ब ठेवल्याची अफवांचे प्रकार पुन्हा एकदा वाढले आहेत. राज्यातील विविध न्यायालय बामणे उडून देण्याचा मेल यापूर्वी आला होता. त्याची नाशिकला पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे.
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची नवी इमारत बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल गुरुवारी प्राप्त झाला. न्यायालयाच्या संकेतस्थळावर अज्ञात व्यक्तीने हा मेल पाठवला होता. हा मेल उघडल्यावर प्रशासनाची धावपळ उडाली.
अशा प्रकारचा मेल न्यायालयाला दुसऱ्यांदा मिळाला आहे. राज्यातील विविध न्यायालयांना यापूर्वी अशा प्रकारचा धमकीचा मेल प्राप्त झाला होता. बॉम्ब ठेवल्याची माहिती असल्याने प्रशासनाने मात्र तो प्रकार गांभीर्याने घेतला
यासंदर्भात पोलिसांना माहिती दिल्यावर दहशतवाद विरोधी पथक तसेच बॉम्बशोधक नाशक पथक तातडीने न्यायालयात दाखल झाले. गणेश शाखेच्या पथकानेही तातडीने न्यायालयात धाव घेतली. साडेचार तास न्यायालयाचे कामकाज बंद ठेवून इमारतीची तसेच परिसराची तपासणी करण्यात आली.
बॉम्बशोधक पथकाने इमारतीतील सर्व संशयित जागा तसेच कपाटे आणि कागदपत्रांची देखील तपासणी केली. कोणतीही शंका राहू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात हे पथक होते. दिवसभर या पथकाच्या उपस्थितीने न्यायालयात मात्र खळबळ उडाली होती. तपासणीनंतर ई-मेल हा अपवाद ठरला.
यापूर्वी दोन नोव्हेंबरला देखील जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावरती इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा मेल आला होता. धमकीच्या मेल मुळे न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम झाला. अशाच प्रकारचा मेल दुसऱ्यांदा आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामुळे अशी जाऊन तपास करण्याचे निर्देश दिले आहे.
न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब शोधण्यासाठी पोलिसांच्या अल्फा आणि लकी या प्रशिक्षित श्वानांनी सर्व मजले पालथे घातले. प्रत्येक वस्तूची बारकाईने तपासणी केली. वकील आणि प्रशासनाच्या दृष्टीने बॉम्ब शोधणाऱ्या लकी आणि अल्फा यांची कार्यपद्धती उत्सुकता आणि चर्चेचा विषय ठरली.