Youth on Drugs Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime: ड्रग्सने आवळला युवा पिढीला विळखा, व्यसनाधिनांचा खुले आम गोंधळ!

Nashik Drugs; Nashik drug bust, youth issue, challenges police -नाशिकमध्ये मध्यरात्रीपर्यंत ड्रगच्या विळख्यातील युवकांचा सुरू असतो हैदोस, पोलिसांनाही दिले आव्हान

Sampat Devgire

Nashik police action: नाशिक शहरात सहा महिन्यांपूर्वी एमडी ड्रग्स निर्मितीचा मोठा कारखाना उघडकीस आला होता. यामध्ये ललित पाटील हा मुख्य संशयीत होता. त्याचा सत्ताधारी राजकीय पक्षांच्या नेत्यांशीही संबंध जोडला गेला होता.

सोमवारी रात्री याबाबत पोलिसांना आव्हान देणारी मोठी घटना गंगापूर रोड भागात घडली. यावेळी बॉस्को सेंटर येथे ड्रग्स घेतलेल्या तरुणांनी थेट पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांनी या ड्रग्स घेतलेल्यांना ताकीद देण्याचा प्रयत्न केला होता.

यावेळी ड्रग्ज घेतलेल्या काही युवक आणि मुलींनी थेट नाशिकच्या पोलिसांनाच अरेरावी, शिवीगाळ आणि धमकी देण्याचे प्रकार घडला. यातील ड्रग्ज घेतलेल्या मुली थेट पोलिसांच्या अंगावर देखील जाण्याचा प्रयत्न करत होत्या. याबाबत पोलिसांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनाच धमकावण्याचा प्रकार घडला.

या संदर्भात पोलिसांना आव्हान देण्याचा प्रकार झाल्याने याबाबत महिलांची कुमक मागविण्यात आली. त्यानंतर ड्रग्स घेतलेल्या या तरुणांना पोलीस ठाण्यात नेण्यात येऊन समज देण्यात आली. मात्र असे प्रकार आता वरचेवर घडू लागले आहेत. त्यामुळे नाशिक शहराची प्रतिमा बिघडते की काय, अशी स्थिती आहे

विशेषतः ड्रग्ज माफीयांचे जाळे विविध भागात पसरले आहे. पोलीस हे जाळे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र युवकांमध्ये ड्रग्सची आवड वाढत आहे की काय अशी स्थिती आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षण संस्था पुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. आता ते कसे पूर्ववत करावे असा प्रश्न पोलीस यंत्रणे पुढे आहे.

आता पुन्हा एकदा नाशिक शहरात ड्रग्जची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणातील नसरीन शेख उर्फ छोटी भाभी आणि इरफान शेख उर्फ चिपड्या याच्यावर कारवाई केली होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.

पोलिसांकडून गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागात तसेच सिडकोमध्ये कारवाई करण्यात आली आहे. मात्र या कारवाईला आव्हान देण्याचे काम ड्रग्ज माफिया करत आहेत. यातील मुख्य संशयित ललित पाटील सध्या नाशिकच्या कारागृहात बंद आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT