Popatrao Pawar controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Popatrao Pawar controversy : अशोक खरातमुळे पेच वाढला; पद्मश्री पोपटराव पवारांचा ठाम इशारा, “अख्खं गाव माझ्या..!”

A viral video praising Nashik alleged fake godman Ashok Kharat has landed Padma Shri Popatrao Pawar in controversy in Ahilyanagar : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याबरोबर केलेल्या कार्यक्रमाचा व्हिडिओमुळे पोपटराव पवार अडचणीत सापडले आहे.

Pradeep Pendhare

Ashok Kharat controversy : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या शिवनिका संस्थेच्या ईशानेश्वर मंदिराशी आलेल्या संपर्कावरून पद्मश्री पोपटराव पवार यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोपटराव पवार यांनी अशोक खरात याचे चांगलेच कौतुक केल्याचं दिसतं आहे. माध्यमांमध्ये तशा बातम्या आल्यानंतर त्यावरून अडचणीत सापडलेले पोपटराव पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

पोपटराव पवार म्हणाले, "गावात आम्ही आनंदाने आहोत. हिवरे बाजारातील गावकऱ्यांना सर्व काही माहिती आहे. अशा भोंदूबाबाला शिक्षा झाली पाहिजे, असा हिवरे बाजार ग्रामपंचायतीने ठराव केला आहे. एसआयटी तपासात जे काही समोर येईल, ते सर्वांना माहिती होईल. या प्रकरणात भीती वाटण्याचं कारण नाही. माझे गावकरी, ठामपणे माझ्यासोबत आहेत."

पोपटराव पवार यांनी अशोक खरातसोबत आलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "हा तीन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. आम्हाला काहीच कल्पना नव्हती. हा त्याच्या मंदिरात (Temples) झालेल्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता. तिथं वारकरी संप्रदायातील अनेक लोकं होती. समोरच्या व्यक्तीचे दुर्गुण माहिती नसतात. अशावेळी व्यासपीठावर आपण अशा माणसांचं कौतुकच करतो."

पोपटराव पवार यांनी अशोक खरात याच्या अंकशास्त्रज्ञ, 'ओशनोलॉजी'ची कौतुक केल्याचं देखील व्हिडिओमध्ये (Video) दिसतं आहे. यावर पवार यांनी, 'ओशनोलॉजी' काय आहे, हे माहिती असायचं कारण नाही. तिथं कार्यक्रमात ज्या चर्चा सुरू होत्या, त्याचा आपण धागा पकडत बोललो. युरोपियन देशात अशा, तंत्राचा वापर केला जातो. पण त्याचीही आपल्याला कल्पना नाही, असे स्पष्ट केलं.

अशोक खरातचा प्रताप उघडकीस आल्यानंतर लक्षात आलं. पण यात आपला अध्यात्मिक सोडून कोणताही संबंध नाही, असे सांगताना, गावात आम्ही आनंदाने आहोत. हिवरे बाजारातील गावकऱ्यांना सर्व काही माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात एसआयटी नेमली आहे, भोंदुगिरीला चाप लावण्याचे काम केले आहे, त्याचे पोपटराव पवार यांनी कौतुक केले.

भोंदूबाबाच्या शिक्षेसाठी ठराव

अशोक खरात याला भोंदूबाबा योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, असा हिवरे बाजार ग्रामपंचायतीने ठराव केला आहे, याची माहिती देताना, एसआयटी तपासात जे काही समोर येईल, ते सर्वांना माहिती होईल. याप्रकरणात भीती वाटण्याचं कारण नाही. माझे गावकरी, ठामपणे माझ्यासोबत आहेत, असा दावा देखील पोपटराव पवार यांनी केला.

आपलं काहीही नाही

पोपटराव पवार यांनी, माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर अख्खं गाव गोळा झालं होतं. फोन आले. चर्चा झाल्या. आम्ही आहोत, आम्ही उत्तर देऊ. गावासाठी मंदिराचा कार्यक्रम केला आहे. यात आपलं काहीही नाही, असं स्पष्ट केलं.

अशोक खरात संबंध कसे आले

अशोक खरात याच्याशी संपर्क कसा आला, यावर बोलताना पोपटराव पवार यांनी, या व्यक्तीशी संबंध आला तो गावात बांधण्यात येणाऱ्या मंदिरामुळे! आम्हाला दगडाचं मंदिर बांधायचं होतं. ज्या कारागिरांकडे गेलो होतो, त्यांनी आम्हाला काही फोटो दाखवले. त्यात अशोक खरात याने बांधलेल्या ईशानेश्वराचे मंदिराचा फोटो दाखवला. त्यातून तिथं गेलो. यानंतर गावात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली, अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक लोकांना बोलवण्यात आलं होते. त्यात हे देखील होते. यामध्ये अध्यात्मिक संबंध सोडून कोणताही दुरान्वये संबंध आलेले नाही, अशे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT