Shalarth ID Scam: बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरली असून यामध्ये शासनाचे 160 कोटींचे अनुदान लाटण्यात आले. एसआयटीने यासंदर्भात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा झाला आहे. कोट्यवधींच्या या शालार्थ आयडी घोटाळ्याचे पुरावे हे पोलीस ठाण्यात बसूनच नष्ट करण्यात आल्याचं समोर आलं आहे. नाशिक, जळगाव, संभाजीनगर आणि धुळे या चार जिल्यांमधून सर्वाधिक घोटाळे समोर आले आहेत. यामध्ये अधिकारी आणि शिक्षण संस्थांचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांवर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.
बनावट शालार्थ आयडी निर्माण करून अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावे कोट्यावधी रुपयांचे अनुदान लाटण्यात आल्याचं हे प्रकरण आहे. या प्रकरणी आतापर्यंत १८ वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षण संस्थांशी संबंधितांना अटक झाली आहे. यातील ११ जणांचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष तपास पथकाने (एसआयटी) याबाबत आता न्यायालयात आरोप पत्र दाखल केले आहे. यामध्ये 160 कोटी रुपयांचा शासनाचा निधी लाटण्यात आल्याचं म्हटलं आहे. यामध्ये ८३९ कर्मचारी बनावट आणि उत्तर महाराष्ट्रातील अस्तित्वात नसलेल्या संस्थांचे असल्याचे स्पष्ट झालं आहे.
आरोपपत्रात काही धक्कादायक बाबींचा उल्लेख आहे. यामध्ये अधिकारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांचे एजंट यांनी संगणमत करून सरकारी निधी लाटला. यात मनोज पाटील यांनी तीन बनावट शाळा दाखवून 48 कर्मचाऱ्यांच्या नावे पगार काढला. स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, पारोळा ही शाळा प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. मात्र, या शाळेच्या नावावर 21 बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या नावे शासनाचा अनुदानाचा निधी वेतन म्हणून हडप करण्यात आला
पाटोदा येथील श्री दत्त विद्यामंदिर या संस्थेच्या लिपिकाने चक्क सख्या भावाच्या नावाने 18 लाख अनुदान काढले. माजी मुख्याध्यापकाशी संगणमत करून राहुल पवार या लिपिकाने आपल्या तीन चुलत भावांच्या नावाने १८.९४ लाखांचा निधी बेकायदेशीर वेतन म्हणून हडप केला.
यातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, "तपास पथकाने शिक्षण उपसंचालक कार्यालयाची आवक-जावक नोंदवही व रजिस्टर पुरावा म्हणून जप्त केला होता. त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यातच या जप्त नोंदवहीत फेरफार आणि नोंदी केल्या. हा पोलीस ठाण्यातच पुरावे नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार असल्याचं समोर आलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं उघड झाला आहे. या प्रकारामुळं अनेकांना धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.