Nashik FDA Takes Action Against Five Popular Misal Points and Cafes : नाशिकच्या सुप्रसिद्ध सायंतारा साबुदाणा वडा व बटाटा कचोरी दुकानावर कारवाई केल्यानंतर आता एफडीएने नाशिकमध्ये आणखी एक मोठी कारवाई केली आहे.
शहरातील पाच नामांकित मिसळ पॉईंट्सवर एफडीएने एकाच दिवशी कारवाई केली असून, या कारवाईत चार हॉटेलचे परवाने व एका हॉटेलचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आलं आहे. या हॉटेल्समध्ये तपासणीदरम्यान अस्वच्छता, उंदरांची विष्ठा, मुदतबाह्य अन्नपदार्थ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले आहे.
परवाना निलंबित करण्यात आलेले हॉटेल्स
१. मे. हॉटेल विहार, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक.
२. मे. हॉटेल श्यामसुंदर, सी रोड, एमआयडीसी, सातपूर, नाशिक. २.
३. मे. हॉटेल तुषार मिसळ, असावरी चेंबर्ससमोर, मलेरिया स्टॉप, कॉलेज रोड, नाशिक.
४. मे. हॉटेल महाराजा काठियावाडी, आडगाव फाटा, आडगाव शिवार, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक
पुढील १ अन्न आस्थापनाचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आलेले आहे.
१. मे. कॅफे दुर्गा कॅफे, क्युबॉइड बिझनेस सेंटर, कृषीनगर, कॉलेज रोड, नाशिक
परवाने निलंबित करण्याची कारणेः
सदर अन्न आस्थापनांच्या तपासणीदरम्यान खालीलप्रमाणे त्रुटी व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले.
१. मे. हॉटेल विहार वुडलैंड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक.
कारणे- १. अन्न सुरक्षा व मानके नियम, २०११ मधील अनुसूची-४ (Schedule-४) मधील तरतुदींचे उल्लंघन २. अन्न आस्थापनांमध्ये अस्वच्छ परिस्थिती आढळून आली आहे. ३. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक व इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
२. मे. हॉटेल श्यामसुंदर सी रोड, एमआयडीसी, सातपूर, नाशिक.
कारणे - १. अन्न सुरक्षा व मानके नियम, २०११ मधील अनुसूची-४ (Schedule-४) मधील तरतुदींचे उल्लंघन. २. अन्न आस्थापनांनध्ये अस्वच्छ परिस्थिती आढळून आली आहे. ३. कच्चा अन्नमाल अस्वच्छ परिस्थितीत साठविलेला आढळून आला आहे. ४. स्वयंपाकघराच्या निर्धारित रचना व बांधकामविषयक अटींचे उल्लंघन.
३. मे. कॅफे दुर्गा कॅफे, क्युबॉइड बिझनेस सेंटर, कृषीनगर, कॉलेज रोड, नाशिक.
१. अन्न सुरक्षा व मानके नियम, २०११ मधील अनुसूची-४ (Schedule-४) मधील तरतुदीचे उल्लंघन. २. अन्न आस्थापनांमध्ये अस्वच्छ परिस्थिती आढळून आली आहे. ३. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बिलांवर FSSAI परवाना क्रमांक नमूद केलेला नसल्याचेही आढळून आले. ४. तपासणीदरम्यान सदर आस्थापनेच्या मेन्यू कार्डवर अथवा डिस्प्ले एरियामध्ये स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमाचा (Cooking Medium) उल्लेख आढळून आला नाही.
४. ने. हॉटेल तुषार मिसळ, असावरी चेंबर्ससमोर, मलेरिया स्टॉप, कॉलेज रोड, नाशिक.
कारणे- १. अन्न सुरक्षा व मानके नियम, २०११ मधील अनुसूची-४ (Schedule-४) मधील तरतुदींचे उल्लंघन. २. अन्न आस्थापनांमध्ये अस्वच्छ परिस्थिती आढळून आली आहे. ३. अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी अपुरी जागा उपलब्ध असणे. ४. अन्न आस्थापनांमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आलेले आहे.
५. मे. हॉटेल महाराजा काठियावाडी आडगाव फाटा, आडगाव शिवार, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक
कारणे- १. अन्न सुरक्षा व मानके नियम, २०११ मधील अनुसूची-४ (Schedule-४) मधील तरतुदींचे उल्लंघन. २. अन्न आस्थापनांमध्ये अस्वच्छ परिस्थिती आढळून आली आहे. ३. स्टोअर रुममध्ये उंदिराची विष्ठा आढळून आली. ४. मुदतबाह्य अन्नपदार्थ साठविलेले आढळून आले. ५. अन्नपदार्थ तयार करण्याच्या जागेत धूळ व किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी व्यवस्था नसल्याचे आढळून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.