Satyajeet Tambe on Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe on Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कामात दिसते काँग्रेस नेत्याची 'झलक'; सत्यजीत तांबे म्हणाले, 'लिडर असावा तर...'

Nashik Graduate Constituency MLA Satyajeet Tambe Praises Devendra Fadnavis Style Compares It to Vilasrao Deshmukh : भाजप सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या कामात सत्यजीत तांबे यांना काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची स्टाईल दिसत असल्याचं कौतुक केलं.

Pradeep Pendhare

Maharashtra politics 2025 : नाशिक पदवधीरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करताना, त्यांच्यात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची झलक दिसते, असं कौतुक केलं.

फडणवीस लिडर म्हणून कौतुक करतात, तेव्हा छान वाटतं, असंही आमदार तांबे यांनी म्हटलं. आमदार तांबे यांनी सरकारनामा डिजिटला मुलाखत देताना, राज्याच्या राजकारणावर भाष्य केले.

सत्यजीत तांबे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कौतुक करतात, तेव्हा चांगलं वाटतं. कोणत्याही लिडरकडून कार्यकर्त्याला दोनच अपेक्षा असतात. एकतर तो मोठ्या मनाचा हवा. दुसरं म्हणजे, तो अॅक्सेसेबल हवा. तुम्हाला काही शंका, अडचण आहेत, तेव्हा तो उपलब्ध पाहिजे. फडणवीससाहेबांमध्ये हे दोन गुण आहेत. ते मोठ्या मनाचे आहेत आणि ते कधीही छोटाही विचार करत नाही, कोणतही काम ते लगेच करतात. त्याचा काय फायदा आहे अन् तोटा आहे, याचा विचार करत नाही. फायदे-तोट्याचं ते काय असेल, ते असेल".

'देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रात ख्याती अशी आहे की, 'SMS'वर काम करणारा मुख्यमंत्री आहे. काँग्रेसच्या (Congress) विलासराव देशमुख यांच्या कामाची झलक देवेंद्रजींमध्ये दिसते. देवेंद्रजींच्या कामाची पद्धत अन् विलासराव यांच्या कामाची पद्धत सारखीच आहे. दोघांचा हा गुण सारखाच आहे. या गुणामुळे विलासरावांना 'विलासराव' केलं. हेच देवेंद्रजींमध्ये आहे. मोठ्या मनाचं आहे. मदत करायला मागे-पुढे पाहत नाही', असेही सत्यजीत तांबे यांनी म्हटलं.

अडचणीत देवेंद्र हमखास मागं उभं राहतात

दुसरी गोष्ट म्हणजे, देवेंद्रजी अजिबात डिसेबल नाही, अॅक्सेसेबल आहेत. आपल्याला उत्तरच मिळत नाही. काय होणार आता? काय होणार आता माझं? अशी भावना समोरच्या मनात कधी येत नाही. चांगल्याच वेळेला आपल्याला भेटणार नाही, पण अडचणीच्या वेळी ते उपलब्ध असतात. कधी-कधी दोन-तीन दिवस रिप्लाय येत नाही. पण त्यांचे कार्यालय खूप शिस्तबद्ध आहे. प्रत्येक गोष्टीची नोंद होते, प्रत्येक पत्र पुढं जातं. पण ज्यावेळेस अडचण येते, त्यावेळी आपण अडचण सांगितल्या, त्यावेळी शंभर टक्के, त्यांच्या कार्यालयातून मदत होते म्हणजे होते, असेही सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

देव निसर्गात आहे

देवेंद्रजींच्या कामाचा अनुभव सांगताना, सत्यजीत तांबे यांनी भंडारदरा धरणाशी निगडीत त्यांचा किस्सा सांगितला. 'भंडारदरा धरणाला उत्तर नगर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणतो, या धरणाला 2026-2027 साली 100 वर्षे पूर्ण होत आहे. ब्रिटिशांनी बांधलेले हे धरण आहे. मी निवडून आल्यापासून इच्छा होती, यानिमित्ताने शंभर वर्षांचा कार्यक्रम करायचा आहे. शतकपूर्ती, त्या धरणापोटी कृतघ्नता व्यक्त करायची आहे. तोच देव आहे. तेच पाणी पित आहे. देव कुठे आहे माहित नाही. देव निसर्गात आहे. तेच पाणी आता संगमनेर शहराला चौवीस तास पुरवठा होत आहे'.

एका मिनिटांत होकार

'निळवंडे धरणाची थेट पाईपलाईन देखील पूर्ण केलेली आहे. हे पाणी गुरुत्वकर्षाने येते, लाईट लागत नाही. हे सगळं झालं, साहेबांना सांगितलं, त्यावेळी ते मागच्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते. शतकपूर्तीचा कार्यक्रम करायचा आहे. देशात नाही, असे वाॅटर म्युझिअम करायचं आहे, पाण्याचं महत्त्व सांगायचं आहे. त्यावर त्यांनी एका मिनिटांत होकार दिला, त्यांनी मला जागा उपलब्ध करून, फंडसुद्धा दिला. क्रिएटिव्ह आयडिया असतील, तर त्याच्या पाठीशी, देवेंद्र फडणवीस उभं राहतात', असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT