Satyajeet Tambe, Shubhangi Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Graduate Election : तांबेंकडून पराभूत झालेल्या शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाल्या.."ही मतं विकली.."

Maharashtra MLC Election News : तांबेंना ६८,९९९ मते मिळाली आहे,तर शुभांगी पाटील या २९,४६५ मतांनी पराभूत झाल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra MLC Election News :नाशिक पदवीधर मतदार संघाच्यानिवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल (गुरुवारी) रात्री अधिकृत निकाल जाहीर केला. यात .सत्यजित तांबेंना ६८,९९९ मते मिळाली आहे,तर शुभांगी पाटील या २९,४६५ मतांनी पराभूत झाल्या आहेत.

पराभवानंतर शुभांगी पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सत्यजित तांबे यांच्यावर त्यांनी गंभीर टीका आणि आरोप केले आहे.

" मी पहिल्यांदा निवडणूकीत उभी राहिली होती, मला 35 हजार मतं पडली आहेत. त्यामुळे ही मतं विकली गेली नव्हती," असा शब्दात पाटील यांनी अप्रत्यक्षपणे तांबे यांच्यावर आरोप केला आहे. "हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा झाला आहे," असे त्या म्हणाल्या.

"ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे काही जण म्हणत होते, मात्र या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना जनतेने घाम फोडला या निवडणुकीमध्ये मी पराभूत झाले असले तरी आता आता मला शिक्षकांसाठी मोठे आंदोलन करायचे आहे. आता माझी खरी लढाई सुरू झाली आहे,"

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील या दोघांमध्ये चुरशीची लढत दिसून आली. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या या निर्णयानंतर भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, मात्र भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नाही. गुरुवारी रात्री १० वाजता सत्यजित तांबे यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.

नाशिक :पदवीधर मतदारसंघ

सत्यजित तांबे विजयी (अपक्ष) एकूणमते ६८,९९९

शुभांगी पाटील (मविआ) २९,४६५ मतांनी पराभूत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT