Girish Mahajan, Satyajit Tambe, Rajesh Pandey
Girish Mahajan, Satyajit Tambe, Rajesh Pandey  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : नाशिक पदवीधर; तांबेनी पाठिंबा मागितला नाही, तरीही भाजपकडून नियोजन सुरू

सरकारनामा ब्यूरो

अभिजीत सोनवणे

Nashik News: नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये दररोज वेगवेगळे ट्विस्ट समोर येत आहेत. नाशिक पदवीधरसाठी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने टक्कर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोघांनीही प्रचारासाठी कंबर कसली आहे.

सध्या नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपकडून बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. त्यामुळे या बैठकामध्ये शिजतंय काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान, अधिकृतपणे पाठिंबा दिला नसला तरी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठीच भाजप रणनीती आखत असल्याची माहिती आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघात सर्वच उमेदवार हे अपक्ष आहेत. शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना महाविकास आघाडीने अधिकृत पाठिंबा दिला आहे. मात्र, सत्यजीत तांबे यांना अधिकृतपणे कोणत्याही पक्षाचा पाठिंबा जाहीर झालेला नाही. तर त्यांनीही कोणाकडेही जाहीर पाठिंबा मागितलेला नाही. तसेच भाजपनेही अधिकृतपणे कुणालाही जाहीर पाठिंबा दिलेला नाही. मात्र, सत्यजीत तांबे यांच्या मदतीसाठी भाजप नेते तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.

भाजपने (BJP) आत्तापर्यंत आपला पाठिंबा कुणालाही जाहीर केला नसला तरी सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना निवडून आणण्यासाठी भाजपने एका वरिष्ठ नेत्यांकडे जबाबदारी सोपवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच भाजप कामाला लागले असून तांबेंना निवडून आणण्यााठी भाजप विविध बैठका घेत असून त्यांच्या या बैठकांमध्ये नेमकी काय शिजतंय असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

तसेच या बैठकांमधून भाजप रणनीती आखत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजप हे अधिकृतरीत्या कोणालाही पाठिंबा न देता अप्रत्यक्षरीत्या सत्यजीत तांबे यांच्या मदतीसाठीच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या नाशिक पदवीधर मतदार संघाची संपूर्ण जबाबदारी भाजपने मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राजेश पांडे यांच्याकडे सोपवली असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्येही (Congress) दोन गट पडले आहेत. त्यातील काहींचा तांबे यांना खुलेआम तर काहींचा पडद्याआडून पाठिंबा मिळत आहे. शुभांगी पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीही (Mahavikas Aghadi) जोरदार मैदानात उतरली आहे. त्यामुळे नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघात 'काटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT