Prithviraj Chavan Devendra Fadnavis sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prithviraj Chavan : 'कुंभमेळ्याचा पैसा मुख्यमंत्र्यांच्या घरचा नाही'; चव्हाणांचा फडणवीसांना चिमटा, तोही नाशिकमध्ये येऊन

Prithviraj Chavan On Devendra Fadnavis : कॉंग्रेस नेते व माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुंभमेळ्याच्या पैशांवरुन खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची आपल्याला कीव येते असेही ते म्हणाले.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांवरुन कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र डागलं.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी खर्च होणारा पैसा मुख्यमंत्र्यांच्या घरचा नाही, तो जनतेचा आहे. त्यामुळे हा पैसा कसा आणि कुठे खर्च होतो, हे जनतेला समजले पाहिजे, असे सुनावत चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना खोचक टोला लगावला.

नाशिकमध्ये संघटन सृजन अभियानांतर्गत काँग्रेसचे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबीर सुरु आहे. २ सप्टेंबरला या शिबिराचा समारोप होणार असून त्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील नाशिकमध्ये येणार आहे. या शिबिरासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोमवारीच नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींचा निधी खर्च होणार असून त्यावरुन विरोधक साशंकता व्यक्त करत आहेत. कुंभमेळा कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी अशा पद्धतीने ओरड करुन कुंभमेळ्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले होते. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

चव्हाण म्हणाले, नाशिकच्या जनतेला विश्वासात घेऊन विकासकामे झाली पाहिजेत. कुंभमेळ्यानंतरही ही विकासकामे उपयोगी ठरली पाहिजेत, मात्र खर्चाबाबत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची आपल्याला कीव येते, मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने अशी विधाने करणे योग्य नाही अशी टीकाही त्यांनी केली.

समृद्धी महामार्गावरील दरोड्याच्या घटनेवरही चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरले. महामार्गावर पेट्रोल पंप, स्वच्छतागृहे, किरकोळ दुकाने आणि इतर जनसुविधा असणे आवश्यक असताना त्या उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री हे गृहमंत्रीही असल्याने त्यांनी महिला आणि बालकांवरील अत्याचार तसेच शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारने दिशाभूल केली असेल

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना, सरकारने दिलेली आश्वासने पाळली की मोडली, हे आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जरांगे पुन्हा आंदोलनाला बसले आहेत, याचा अर्थ सरकारने कुठेतरी त्यांची दिशाभूल केली असावी, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT