leopard in Nashik Kumbh Mela Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : नाशिकच्या कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? कुणाला पडला प्रश्न? गिरीश महाजनांना कुणी काढले चिमटे?

Anil Parab on Girish Mahajan : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात बिबट्यांच्या विषयावरही चर्चा झाली. यावेळी नाशिकच्या कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनादरम्यान विधानसभा आणि विधानपरिषदेत विविध विषयांवर चर्चा होत आहे. काल विधानपरिषदेत भटके कुत्रे व बिबट्यांच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. बिबट्याच्या मुद्द्यांवरून काही प्रश्न उपस्थितीत करत अनिल परब यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना चिमटे काढले.

चर्चेदरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्यात लवकरच बिबट्या सफारी वाढणार असल्याची माहिती दिली. यामुळे पर्यटन पण होईल आणि मनाव आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष थांबेल, त्यामुळे लवकरच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी वाढणार असल्याचं नाईक म्हणाले. या चर्चेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विधानपरिषद आमदार अनिल परब यांनी उडी घेतली. त्यांनी केलेल्या विधानाने सभागृहात एकच हश्शा पिकला.

अनिल परब म्हणाले की, माझा प्रश्न हा काही प्रश्न-उत्तराच्या तासातील प्रश्न नाही. मी क्यूरॅसिटी म्हणून हा प्रश्न विचारत आहे. भटके कुत्रे आणि बिबट्या हे दोन वेगवेगळे विषय आहेत. पण तरी देखील कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? असा सवाल करत कुंभमेळ्याच्या संभाव्य धोक्यांबाबत परब यांनी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना चिमटे काढले.

अनिल परब पुढे म्हणाले, मुळात एकदा गिरीश महाजन ज्या ठिकाणी घुसले तिथे दुसऱ्या कुणाची काय हिम्मत आहे घुसायची? कारण ते तेवढे सक्षम आहे. गिरीश महाजनांनी खूप वाघ, बिबटे फाडून जेरबंद केले आहेत. ते आम्ही बघितले आहे. त्यामुळे हा प्रश्न लागू होतो की नाही माहित नाही असा टोला त्यांनी महाजन यांना हाणला.

आता खाली बसून त्यांनी म्हटलं की डिझास्टर (Disaster) मॅनेजमेंट माझ्याकडेच आहे, तर सभागृहातील पाठिमागून कोणी तरी म्हटलं की, डिझास्टरच तिथे गेलेलं आहे, तर मग आणखी मॅनेजमेंट काय करायची? हा माझा दुसरा विषय आहे. तसेच तिसरा विषय कुंभमेळ्यात कॅमेऱ्याचा उपयोग कशासाठी होणार? याचाही खुलासा करावा हे माझे प्रश्न आहेत जे आउट ऑफ क्यूरॅसिटी आहे असं अनिल परब यांनी म्हटलं.

त्यानंतर अनिल परब यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, कुंभमेळामंत्री म्हणून गिरीश महाजन यांची निवड झाली आहे. तसेच तसेच त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन पण आहे. मी त्यांना परवाच बोललो की, दीड-दोन वर्षांनी कुंभमेळा आहे. अशात नाशिक जिल्ह्यातील बिबटे आपण जेरबंद नाही केले तर एखाद्या दिवशी त्या कुंभमेळ्यात एखादा बिबट्या घुसला तर कुंभमेळ्यावर पाणी फेरलं जाईल. त्यावर मला महाजन यांनीच लगेच सांगितलं की, मला तुम्ही पत्र द्या आणि तुमची तिकडची गरज काय ते सांगा, मी लगेच निधीची तरतूद करतो. ते आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे. बिबट्यांचे बिबट्यांचे हल्ले ही राज्याची आपत्ती मानूनच आपण त्याकडे बघणार आहोत असं गणेश नाईक यांनी उत्तर देताना म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT