Nashik Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाची प्रक्रिया एवढी मोठी असते की, समापनाच्या दिवशीच १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरु करायला हवी. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०१५ मधील कुंभमेळ्याच्या समारोप सोहळ्यात बोलले होते.
आता तर तुमचेच सरकार आहे. आताही तेच मुख्यमंत्री आहे. परंतु यंदाच्या कुंभाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मुख्यमंत्री. कुंभमेळा गंभीरपणे घ्या, स्वत: ‘मॉनिटरिंग’ करा, अधिकारी व कुंभमेळा मंत्र्यांच्या भरवशावर राहिले तर देशात आपली फजिती होईल, असा इशारा त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष शंकरानंद महाराज यांनी दिला.
अखिल भारतीय संत समितीची नुकतीच चिंतन बैठक झाली. या बैठकीत महंत डॉ. भक्तिचरणदास महाराज, तसेच शंकरानंद महाराज यांनी प्रशासनासह सरकारला चांगलेच धारेवर धरले. यावेळी शंकरानंद महाराज महाराज यांनी कुंभनियोजनावर नाराजी व्यक्त करत कठोर शब्दांत इशारा दिला.
कुंभाची परिस्थिती अत्यंत दयनीय करून ठेवली आहे. अधिकाऱ्यांचा एकमेकांमध्ये कोणताही समन्वय नाही. कामे अद्याप मध्यावरही आलेली नाहीत. कुंभमेळा यशस्वी करून दाखवायचा असेल तर स्वत: मुख्यमंत्र्यांनी एकदा त्र्यंबकेश्वरला येऊन आखाड्यांची बैठक घ्यावी, त्यात आम्ही मते मांडू, असे आवाहन शंकरानंद महाराज यांनी केले.
शंकरानंद महाराज पुढे म्हणाले, मी सनातनी आहे. परंतु आता खरे बोलण्याशिवाय गत्यंतर नाही. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सर्व कामांचा खेळ करून ठेवला आहे. लोकांना रोजचे जगणे अशक्य झाले आहे. कुंभमेळामंत्र्यांचेही याकडे हवे तसे लक्ष नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळा मंत्र्यांच्या भरवशावर राहू नये. नाही तर कुंभमेळा आजच ७५ ते ८० टक्के फेल गेला असे समजा. कुंभमेळा यशस्वी करायचा असेल तर तर मुख्यमंत्र्यांना दररोज कामांचे मॉनिटरिंग करावे लागेल असं शंकरानंद म्हणाले.
आयुक्त गेडाम यांनी फ्रंटवर येऊन बॅटिंग करावी
सरकारने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाजूला केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी कामाची माणसे पुढे आणावीत. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी आता फ्रंटवर येऊन बॅटिंग करावी. सक्षम अधिकाऱ्यांची आता जास्त गरज आहे असं शंकरानंद महाराज म्हणाले.
सिंहस्थासाठी तयार करण्यात आलेल्या प्राधिकरणाचे काय चालले आहे, त्यांचे त्यांनाच माहीत नाही. त्यांच्यात एकमेकांमध्ये अजिबात समन्वय नसल्याची टीका शंकरानंद यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.