Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : बनावट आदेशांचा खेळ थांबणार; कुंभमेळा प्राधिकरणाने अखेर उपाय शोधला..

Nashik Kumbh Mela QR Code System : बनावट आदेश व कागदपत्रांतील फेरफारांना आळा घालण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने उपाय शोधला आहे. प्रत्येक प्रशासकीय आदेशावर आता QR Code असेल.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सध्या विविध विकासकामे सुरु आहेत. परंतु कामांमध्ये कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने बनावट आदेश, मंजुऱ्या देण्याचे धक्कादायक प्रकार गेल्या काही महिन्यांत उघडकीस आले. त्यामुळे प्राधिकरणाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. यासर्व पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने आता सुरक्षितता बाळगण्याचा निर्णय घेतला असून अशा गैरप्रकारांना व फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपाय शोधला आहे.

त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी प्राधिकरणाने आता क्यूआर कोडची मात्रा शोधून काढली आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या सर्व प्रशासकीय आदेशांसाठी युनिक क्यूआर कोड आधारित डिजिटल ई-ऑथेंटिकेशन प्रणाली विकसित केली गेली आहे. या प्रणालीमुळे आदेशांची सत्यता पडताळणे शक्य होणार आहे.

क्यूआर कोड प्रणालीअंतर्गत प्राधिकरणाच्या प्रत्येक आदेशावर आता युनिक कोड असणार आहे. नागरिक, कंत्राटदार, शासकीय अधिकारी किंवा संबंधित यंत्रणांना मोबाईलद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून आदेशाची सत्यता पडताळता येईल. संबंधित आदेश शासनाच्या अधिकृत सार्वजनिक पोर्टलवरील मूळ दस्तऐवजाशी लिंक केला जाणार असल्याने आदेशाची अधिकृत आवृत्ती सहज उपलब्ध होण्यास मदत मिळेल.

या प्रणालीमुळे बनावट आदेश, कागदपत्रांमधील फेरफार किंवा दिशाभूल करणाऱ्या दस्तऐवजांना आळा बसणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने होत असलेल्या विकासकामांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि उत्तरदायित्व अधिक बळकट करण्याच्या दिशेने प्राधिकरणाने क्यूआर कोड प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या सहाय्याने कामांचे प्रशासकीय आदेश, मंजुरी, निर्देश तसेच पत्रव्यवहारात पारदर्शकता राखली जाईल.

त्यामुळे आता प्रत्येक अधिकृत आदेशावर युनिक कोड असेल जो शासनाच्या अधिकृत सार्वजनिक पोर्टलशी थेट लिंक असेल. ज्यातून नागरिक, कंत्राटदार, अधिकाऱ्यांसाठी सुलभ डिजिटल पडताळणी शक्य होईल. यातून बनावट आदेश व कागदपत्रांतील फेरफारांना आळा बसण्याची आशा आहे.

QR Code प्रणालीचे फायदे

- प्रत्येक अधिकृत आदेशावर युनिक कोड

- शासनाच्या अधिकृत सार्वजनिक पोर्टलशी थेट लिंक

- बनावट आदेश व कागदपत्रांतील फेरफारांना आळा

- नागरिक, कंत्राटदार, अधिकाऱ्यांसाठी सुलभ डिजिटल पडताळणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT