Nashik Market Committee : नाशिक बाजारसमितीच्या रिंगणात पिंगळे विरुद्ध चुंबळे हा संघर्ष सर्वश्रुत आहे. देविदास पिंगळे यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या ९ संचालकांनी बंडखोरी करत चुंबळे गटाला साथ दिली होती. संचालकांनी पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला व त्यातून सत्तांतर झालं. बाजार समितीवर आता भाजपची सत्ता असून भाजपच्या कल्पना चुंबळे सभापती आहेत.
बाजार समितीचे सभापती पद हाती येताच कल्पना चुंबळे यांनी देविदास पिंगळे यांच्या कार्यकाळातील निर्णयांवर आक्षेप घेत ते रद्द करण्याचा धडाका सुरु केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आजूनही सुरुच आहेत. कल्पना चुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बाजार समितीच्या सर्वसाधरण सभेत पुन्हा एकदा चुंबळे यांनी पिंगळे यांना लक्ष्य केलं. पिंगळे यांच्या कार्यकाळातील कामांची त्यांनी पोलखोल केली.
पिंगळे यांच्या कार्यकाळात सभेची मान्यता न घेताच लाखो रुपयांची कामे करण्यात आली असून त्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. तसेच झालेल्या बांधकामांची चौकशी करण्यात यावी यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पत्रही देण्यात आल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती कल्पना चुंभळे यांनी सर्वसाधारण सभेत दिली.
पिंगळे यांच्या काळात ज्या काही सभा झाल्या त्यास सदस्य उपस्थित नसतानाही त्यांची नावे ठरावास सूचक आणि अनुमोदक म्हणून टाकण्यात आल्याचा आक्षेप चुंबळेंनी घेतला आहे. तर पिंगळे यांनी चुंबळे यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. याउलट बाजार समितीत सहा महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप पिंगळेंनी केला आहे. आपणच ६ महिन्याच्या कारभाराविरोधात पोलिस व शासनाकडे तक्रार करणार असल्याचं पिंगळेंनी सांगितलं आहे.
गेल्या सहा महिन्यापांसून सर्व कामे गैरमार्गाने सुर असून समितीचे २५ कोटींचे उत्पन १८ कोटींपर्यंत आले आहे. संचालकांचे समितीच्या कामकाजावर कोणतेही लक्ष नसून पदाधिकाऱ्यांकडून केवळ वसुलीचे उद्दिष्ट असल्याचा आरोप करीत वाढदिवसालाही व्यापाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी केला आहे. याचा तपास करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.