Nashik MHADA  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MHADA Housing Scandal: म्हाडात १५४ कोटींचा महाघोटाळा; बनावट कागदपत्रांचा खेळ, बिल्डरांनी पोलिसांना फिरवलं का?

Nashik MHADA flat scam after week, No officer nor builder Arrest Police Inquiry-बनावट कागदपत्र सादर करून शासनाच्या महापालिका आणि म्हाडाचा मोठा घोटाळा

Sampat Devgire

Nashik MHADA Fraud : 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असे वदवून घेत दरारा निर्माण केला आहे. मात्र याच पोलिसांना म्हाडा घोटाळ्यात मार्ग सापडेना. त्यामुळे सर्व तपास ठप्प झाल्याचे चित्र आहे. 

नाशिक शहरातील ४९ बांधकाम प्रकल्पांमध्ये व्यवसायिकांनी घोटाळा केला. यामध्ये शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत १५४ कोटींना गंडा घालण्यात आला. ४९ बांधकाम व्यावसायिकांवर याबाबत पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

गुन्हे दाखल होऊन आठवडा उलटला तरीही पोलिसांना फक्त एक बिल्डर सापडला. सोनू मनवाणी या बिल्डरला अटक झाली. मात्र त्याच्याशी भागीदारी असल्याचा संशय असलेल्या भाजपच्या नेत्याला पोलिसांनी चौकशीनंतर सोडून दिले आहे. 

नाशिक शहरातील म्हाडाच्या सदनिकांच्या या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. चार हजार चौरस मीटर पेक्षा अधिक क्षेत्रातील वीस टक्के सदनिका आर्थिक दुर्बल घटकांना विक्री करायच्या असतात. त्यातील तीनशे ते चारशे कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या सदनिका बांधकाम व्यवसायिकांनी हडप केल्या. मात्र याबाबत बहुतांशी बिल्डर गुन्हा दाखल झाल्यानंतर परागंदा झाले आहेत. 

बांधकाम व्यावसायिकांशी संबंध असलेल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही राजकीय नेत्यांचा या प्रकरणात थेट संबंध असल्याचे बोलले जाते. मात्र गेल्या आठवड्याभरात एकाही बांधकाम व्यवसायिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. 

नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'असे गुन्हेगारांकडून वदवून घेत पोलिसांनी दरारा निर्माण केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणल्याचा दावा केला. मात्र यापूर्वी दाखल झालेल्या जमीन घोटाळ्यात आणि सध्याच्या महाडा घोटाळ्यात बिल्डरवर कारवाई करताना नाशिकच्या पोलिसांना यश आले नाही. 

म्हाडा सदनिका घोटाळा प्रकरणाच्या दिसून अधिक बिल्डर फरार झाले आहेत. यातील बहुतांशी बांधकाम व्यवसायिकांनी अटकपूर्व जामीन्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी हे त्या मंगळवारी (ता. २४) होणार आहे. कदाचित पोलीसही बांधकाम व्यवसायिकांना सेफ मेसेज देण्यासाठी या सुनावणीची प्रतीक्षा करीत असावेत. 

गुन्हा दाखल झाल्याने पलायन झालेल्या बांधकाम व्यवसायिकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. बिल्डर फरार झाल्याने त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली जात आहे. या संदर्भात शुक्रवारी दोन महिलांसह काही नातेवाईकांची चौकशी झाली. मात्र या प्रकरणाचा तपास फारसा पुढे सरकला नाही. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT