Nashik BJP Politics: नाशिक येथील म्हाडा सदनिका फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली असून १५४ कोटींच्या या गैरव्यवहारात अनेक बांधकाम व्यवसायिक अडकले आहेत. त्यांना वाचविण्याचा आटापिटा राजकीय नेते करीत असल्याचे उघड झाले आहे.
नाशिक महापालिका हद्दीत म्हाडाच्या वीस टक्के सदनिका शासनाला हस्तांतरित करणे अपेक्षित होते. मात्र 49 प्रकल्पांमध्ये यात मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्यात सत्ताधारी भाजप सह अन्य राजकीय पक्षांचे काही नेते गुंतले असल्याचे पुढे आले आहे.
या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी हॅप्पी होम डेव्हलपर्स संचालक दिनेश कन्हैयालाल उर्फ सोनू मनवाणी यांना अटक केली. त्यांचा मुलगा हा देखील पोलिसांच्या रडारवर आहे. मात्र या बांधकाम व्यवसायिकाला सॉफ्ट कॉर्नर देण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
संबंधित बांधकाम व्यवसाय कला अटक करण्यात आली. त्यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची देखील दिवसभर चौकशी झाली. मात्र अद्याप त्याला अटक झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गैरव्यवहारात म्हाडाच्या अधिकाऱ्यांचं महापालिका प्रशासनाचा ही महत्त्वाचा सहभाग आहे. भूमापन विभागाने या संदर्भात नियमबाह्य पोट विभागणी करण्यास मान्यता दिली. त्यासाठी महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
या संदर्भात भूमापन विभागाने राज्य सरकारच्या सूचनेनुसार तपास केला. त्याचा अहवाल सरकारला सादर झाला. मात्र यामध्ये केवळ 49 प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. उर्वरित शंभरहून अधिक प्रकल्पांना क्लीन चिट दिल्याचा संदेश यातून जातो.
आता या प्रकरणाचे धागेदोरे लांबपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक बांधकाम प्रकल्पांमध्ये थेट सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्यांचा संबंध आहे. या प्रकल्पांमध्ये काही राजकीय नेत्यांची थेट भागीदारी आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
त्यात सरकार वाडा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरापर्यंत स्थायी समितीचा माजी सभापती असलेल्या एका माजी नगरसेवकाची चौकशी केली होती. संबंधित नेता गुन्हा दाखल झालेल्या एका प्रकरणात भागीदार असल्याचा दावा केला जात आहे. त्याला अटक होते की पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.