Himgauri-Aher-Adke.jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MHADA Scam: म्हाडा सदनिका घोटाळा; महापौर हिमगौरी अडके महापालिका अधिकाऱ्यांच्या पाठीशी!

Nashik MHADA Scam BJP Himgauri Adake supports NMC Officer-म्हाडा घोटाळ्याच्या चौकशीच्या दबावाने महापालिका अधिकारी दडपणाखाली

Sampat Devgire

Himgauri Adke News: म्हाडा सदनिका घोटाळ्यात 49 बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दीडशे कोटींच्या या घोटाळ्यात म्हाडा आणि महापालिकेच्या अभियंत्यांना यापूर्वीच अटक झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन पोलीस चौकशीने दडपणाखाली आले आहे.  

एक एकर पेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या भूखंडावर वीस टक्के सदनिका म्हाडाला हस्तांतरित करण्याचा नियम आहे. मात्र कागदपत्रांत हेरफेर करून बांधकाम व्यवसायिकांनी त्यात पळवाट शोधली. यामध्ये दीडशे प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात आहेत. 

याप्रकरणी घरातील 49 प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायिक अडकले आहेत. त्यांना मदत केल्याप्रकरणी महापालिका अभियंता कल्पेश पाटील यांना अटक झाली आहे. म्हाडाच्या अभियंत्यालाही अटक झाल्याने खळबळ उडाली. 

या प्रकरणात पोलिसांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या नगररचना विभागातील माहिती संकलित केली. पोलिसांच्या या चौकशीमुळे नगररचना विभागातील अधिकारी दडपणाखाली आले आहेत. यातील काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर असल्याने प्रशासन दडपणाखाली आहे. 

पोलिसांच्या चौकशीमुळे महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता महापौर हिमगौरी आडके यांनी उडी घेतली आहे. महापौरांनी प्रशासनाच्या पाठीशी उभे राहत महाडा घोटाळ्यात महापालिकेची बदनामी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

या प्रकरणात प्रामाणिक अधिकाऱ्यांनीही चौकशीचा दस का घेतला आहे. ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही त्यांनी घाबरून जाऊ नये. महापालिका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे महापौरांनी स्पष्ट केले. 

या घोटाळ्यात एखाद दुसऱ्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे महापालिकेची प्रतिमा मलीन होता कामा नये. सबंध प्रशासनाकडे संशयाने पाहू नये. याबाबत पोलिसांच्या चौकशीला महापालिका सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

म्हाडा घोटाळ्यात कोट्यावधीची फसवणूक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची चिन्हे आहेत. उपमहापौर विलास शिंदे यांनी याबाबत काही घटक जाणून-बुजून महापालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. एकंदरच म्हाडा घोटाळ्याचा तपास कोणत्या दिशेला सरकतो याचा राजकीय नेत्यांनी धसका घेतल्याचे दिसते आहे. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT