Nashik MLC Election | Gokul Gite | Narendra Darade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Election : गोकुळ गिते केव्हाही करु शकतात चमत्कार, दराडेंना शेवटपर्यंत ती एक भीती राहणार

Gokul Gite Vs Narendra Darade : नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा प्रचार थांबवत असल्याचे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी जाहीर केलं. यातून दराडेंना तात्पूरता दिलासा मिळाला आहे.

Ganesh Sonawane

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी काल प्रचार थांबवण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर तसेच तीन मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंरतु त्यांनी हा केवळ तात्पुरता पुर्णविराम दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामागे कारणही तसे आहे.

काल महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंब्याचा उच्चार गोकुळ गितेंनी केला नाही. आपण केवळ प्रचार थांबवतोय असं गिते म्हणाले. नरेंद्र दराडे यांना आपण जाहीर पाठिंबा देणार का? त्यांच्या प्रचारात आपण उतरणार का असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी केला असता गोकुळ गिते हे खूर्चीवरुन उठून निघून गेले. काल पत्रकापरिषदेत घडलेलं हे नारीजनाट्य अवघ्या नाशिकने बघितले. गोकुळ गिते असचं काही तरी करतील अशी भिती होती आणि ती खरी ठरली.

त्यामुळे गोकुळ गिते यांचे बंड शमले असले तरी नाराजी कायम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. गितेंनी दराडेंना जाहीर पाठिंबा न दिल्याने महायुतीमधील समेटाबाबत आजूनही संभ्रम कायम राहिला आहे.

उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्याने तांत्रिक दृष्ट्या अपक्ष उमेदवार गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे या दोघांची नावे मतपत्रिकेवर कायम राहणार आहेत. ही केवळ तोंडी स्वरुपाची माघार आहे. त्यामुळे निकालापर्यंत राजकीय उत्सुकता कायम राहणार आहे.

गोकुळ गिते यांनी आपण घरी बसलो तरी निवडून येऊ. माझ्या मित्र-परिवाराने ही निवडणूक हातात घेतली आहे असे विधान माघारीपूर्वी केले होते. गोकुळ गिते यांनी प्रचार थांबवतो असं सांगितलं असलं तरी दराडेंना जाहीर पाठिंबा दिलेला नाही. मतपत्रिकेवर त्यांचे नावही कायम राहणार आहे. अशात मतदारांनी गोकुळ गिते यांना मते दिली तर ...राजकारणात काहीही होऊ शकतं..गोकुळ गिते आजूनही केव्हाही चमत्कार करु शकतात अशी चर्चा आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

मत पत्रिकेवर गोकुळ गिते यांचे नाव कायम असल्याने नरेंद्र दराडे यांना शेवटपर्यंत या चमत्काराची भीती व धाकधूक राहणार आहे. त्यांना शेवटपर्यंत सावध राहावे लागेल असे एकंदरीत यावरुन दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT