Shivsena UBT News: नाशिक विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये ९९.८४ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे महायुतीच्या उमेदवाराने दिवसभर धावपळ केली. त्यांच्या मदतीसाठी दोन मंत्री दिवसभर महायुतीच्या मतदारांवर जातीने लक्ष ठेवून होते.
महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विषयी भाजप नेत्यांमध्येच सुरुवातीला नाराजी होते. त्यातूनच प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गीते यांनी उमेदवारी दाखल केली. या उमेदवारांची नावे मतपत्रिकेवर मतदानाच्या दिवशी देखील होती. त्यामुळे तो राजकीय चर्चेचा विषय होता.
महायुतीच्या विशेषता भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या मतदारांना नेत्यांनी ठाणे येथे रिसॉर्टवर सहलीला नेले होते. ही सहल विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरली. या मतदारांच्या अपेक्षा उमेदवाराकडून पूर्ण झाल्या की नाही हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहिले.
अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने माघार घेतली. माघारीसाठी मंत्री गिरीश महाजन शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उदय सामंत आणि दादा भुसे अशा तीन मंत्र्यांना दिवसरात्र एक करावी लागली. करू नये अपक्ष गीते यांनी उघडपणे महायुतीचे दराडे यांना पाठिंबा जाहीर केलाच नाही.
मतदानाच्या दोन दिवस आधी गोकूळ गीते यांच्यासाठी त्यांचे काही समर्थक जिल्हाभर फिरत होते. त्यांनी मतदारांना प्रभाव टाकणाऱ्या विविध नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची व्यक्तिशः गाठी भेटी घेतल्या. अनेक नेत्यांशी रात्रभर चर्चा केली. हेच काय मतदानाच्या दिवशी सकाळी तीन उमेदवार अर्थात गिते यांचे नाव असलेली मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली.
ही बातमी समजताच महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची झोप उडाली. तक्रारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचल्या. मुळे मतदानाच्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा गोकुळ गीते यांना आपण प्रचार केला नसल्याचे जाहीर करावे लागले. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत हे दोन्ही मंत्री नाशिकला हजर झाले.
विशेषता जळगाव ही प्रतिष्ठेची निवडणूक भाजपसाठी होती. तेथे महाजन यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. मात्र महाजन सायंकाळी धावत पळत नाशिकला पोहोचले होते. त्याचे कारण म्हणजे प्रत्यक्षात मतदाराच्या पातळीवर वेगळेच काही घडत होते. त्यामुळे निवडणुकीच्या निकालात "खेला होबे का"ही चर्चा मतदानाच्या दिवशी अचानक जोर धरू लागली.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे मतदान झाले. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचे सदस्य झाडून मतदानाला हजर राहिल्याने चर्चेचा विषय ठरला. इस्लाम आणि एमआयएम या पक्षांसह अन्य महायुती विरोधकही झाडून मतदानाला आले. त्यामुळे नाशिक विधान परिषदेच्या निवडणूक निकालावर त्याचा काय परिणाम होतो, ही चर्चा जोर धरू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.