Nashik civic body budget breakdown 2026: नाशिकमध्ये ३१ ऑक्टोबर २०२६ पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळामंत्री म्हणून काम पाहत आहेत. कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाजपला नाशिकमध्ये सत्ता हवी होती तीही भाजपकडे आली आहे. भाजपच्या हिमगौरी आहेर -आडके या नाशिक महापालिकेच्या महापौर आहेत. महापालिकेची तिजोरी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवरही भाजपचेच वर्चस्व आहे.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती मच्छिंद्र सानप यांना ३ हजार ११ कोटींचे अंदाजपत्रक सोमवारी (दि. २) मार्च सादर केले. मात्र, राज्य शासनाकडून कुंभमेळ्याचा आराखडा मंजूर झालेला नाही. त्यामुळे एकूण विकास कामांच्या निधी पैकी महापालिकेचा हिस्सा स्पष्ट होत नसल्याने अंदाजपत्रकामध्ये टोकन म्हणून अवघ्या एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त निधी मंजूर न झालेले व प्रमुख कामांसाठी ७७ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे.
नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांना आगामी आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर केले. पुढच्या वर्षी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने महापालिकेकडून विकास कामांसाठी किती रुपयांच्या निधीची तरतूद होईल. याबाबत नाशिककरांसोबतच नवनिर्वाचित नगरसेवकांना उत्सुकता होती. परंतु, अंदाजपत्रकामध्ये अवघे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने अनेकांना याबाबत आश्चर्याचा धक्का बसला.
मात्र नंतर स्पष्टीकरण देताना राज्य शासनाने अद्याप कुंभमेळ्याच्या आराखड्याला मंजुरी दिलेली नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे एकूण विकास कामांसाठी मिळणाऱ्या निधीतून महापालिकेचा नेमका किती वाटा राहणार, महापालिकेला किती प्रमाणात वाटा खर्च करायचा आहे, याबाबत अनिश्चितता आहे. याच कारणामुळे अंदाजपत्रकामध्ये एक कोटी रुपयांची टोकन म्हणून तरतूद करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं.
सिंहस्थ आराखड्याव्यतिरिक्त कामांसाठी मात्र ७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच म्युनिसिपल व हरित रोखेचे प्रत्येकी २०० कोटी रुपये असे एकूण ४०० कोटी रुपये तर दोनशे कोटी रुपये स्वनिधी खर्च केला जाणार आहे. अशाप्रकारे एकूण ६०० कोटी रुपयांची तरतूद आहे. सिंहस्थ कुंभमेळा कामांसाठी तीन वर्षात महापालिकेकडून ८२६ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.