Nashik Politics : भारतीय जनता पक्षाने नाशिकच्या महापौरपदी कोणाला संधी देणार हे गुलदस्त्यात ठेवले होते ते आता स्पष्ट केले आहे. आज नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. त्यात याबाबत चाचपणी करण्यात आली.
नाशिक महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ६ फेब्रुवारीला होत आहे. यासंदर्भात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. हॉटेल सयाजी येथे झालेल्या बैठकीत बहुतांशी नगरसेवकांची मते आजमावण्यात आली.
यासंदर्भात नगरसेवकांनी सोयीचे नावे पुढे केल्याचे समजते. त्यामुळे भाजपच्या विविध नेत्यांनी नगरसेवकांचे मत जाणून घेतले. याबाबत त्याही नावाची घोषणा करण्यात आली नाही. महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. गतवर्षी सतीश कुलकर्णी यांना महापौर पदाची संधी देण्यात आली होती. अन्य इच्छुक दिपाली गीते या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे आणि मंत्री महाजन यांच्याकडे लॉबिंग केले होते.
हॉटेल सयाजी येथे झालेल्या बैठकीत भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. यावेळी काल संध्याकाळी महाजन नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी तसेच प्रमुख नेत्यांची चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली होती.
भाजपच्या बहुतांशी नगरसेवकांनी नगरसेविका हिमगौरी आडके-आहेर यांच्या नावाला संमती दर्शवली. त्या तुलनेत अन्य इच्छुक मागे पडले. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी तीन नगरसेवकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याचे कळते.
प्रत्यक्ष महापौर निवडणुकीच्या महासभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांसह अन्य वरिष्ठांच्या सल्ल्याने नावांवर अंतिम निर्णय होईल. मतदानाच्या दिवशी बंद लिफाफ्यातील नावे कळविण्यात येणार आहे.
महापौरपदी हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदी मच्छिंद्र सानप यांची नावे जवळपास निश्चित झाली आहे. मात्र पक्षाच्या संकेतानुसार त्याबाबतची घोषणा आज होणार नसल्याचे सूत्रांकडून कळते. यानिमित्ताने महायुतीच्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष महापालिकेत सत्तेत सहभागी नसणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.