Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MNS : एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसेचे इंजिन फक्त एका जागेवर पडले बंद

Nashik Municipal Election MNS : एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला होता. याच नाशिकमध्ये मनसेचा महापौर होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत मनसेला केवळ एक जागा निवडून आणण्यात यश आलं आहे.

Ganesh Sonawane

Nashik MNS Politics : नाशिक हा एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला होता. पण त्याच बालेकिल्ल्यात मनसेची अवस्था आज पार वाईट झाली आहे. पक्षस्थापनेनंतर महापालिकेसह ३ आमदार देणाऱ्या नाशिकमध्ये मनसेचे इंजिन २०२६ च्या पालिका निवडणुकीत अवघ्या एका जागेवर बंद पडले.

भाजपला रोखण्यासाठी मुंबईप्रमाणेच नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राज्यातील पहिली संयुक्त सभा याच नाशिकमध्ये त्यांनी घेतली. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत दोन्ही पक्षांची कामगिरी सुमार राहिली. मनसेला तर फक्त एक जागा जिंकता आली.

मनसेने तब्बल ३० उमेदवार नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र प्रभाग क्रं १३ मध्ये मयुरी अंकुश पवार या एकट्याच निवडून आल्या. उर्वरित मनसेच्या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत (२०१७) मध्ये मनसेला पाच जागांवर यश मिळालं होतं. यावेळी चार जागांची घसरण झाली आहे.

दोन्ही ठाकरे बंधूंची युती नाशिकमध्ये फेल गेली. मनसेला लढवलेल्या ३० जागांपैकी एक जागा व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ७९ जागांपैकी अवघ्या १५ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे उबाठा-मनसे युतीचा प्रयोग नाशिकमध्ये अपयश ठरला.

काँग्रेसलाही अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसने प्रभाग चौदामध्ये तीन जागा जिंकून महापालिकेत किमान अस्तित्व तरी राखले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. तसेच माकप, वंचित व अन्य छोट्या पक्षांना देखील एकही जागा मिळवता आली नाही.

एकेकाळी मनसेचा होता महापौर

२०१२ च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे नाशिककरांनी तब्बल ४० नगरसेवक निवडून दिले होते. त्यामुळे २०१२ ते २०१७ या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर होता. या काळात नाशिक मनसेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजी वाढल्याने मनसेला मोठा फटका बसला. २०२६ च्या महापालिका निवडणुकीत मनसेला केवळ एक जागा जिंकता आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT