Girish Mahajan,Nashik NMC Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan: गिरीश महाजन यांची नवी घोषणा! 'या' शहरात उभारणार अयोध्येसारखे श्रीराम मंदिर

Girish Mahajan on Nashik NMC Election: भाजपने अयोध्येतील श्रीराम मंदिराचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात आणला. त्यातून सत्तेच्या चाव्या मिळवल्या. असाच प्रयोग नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतही होत आहे.

Sampat Devgire

Nashik Mahapalika Election: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. शिवसेना आणि मनसेच्या मुंबईतील सभेची महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये चर्चा होत आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

सिडको येथील भाजपच्या उमेदवारांसाठी गिरीश महाजन यांनी सोमवारी सभा घेतली. ही सभा मतदारांमध्ये चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. त्याला कारणही तसेच घडले.

सिडको येथील सभेत महाजन यांनी नाशिक आणि श्रीराम यांचा पुन्हा एकदा संबंध जोडला. तो थेट निवडणुकीच्या राजकारणात आणला. नाशिकला तपोवनात अयोध्येतील मंदिराच्या धर्तीवर श्री राम मंदिर बांधण्याची घोषणाच त्यांनी केले.

ते म्हणाले मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक हे शहर चर्चेत आहे. नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या शहराला सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे. त्या दृष्टीने या शहराच्या विकासावर आमचे खास लक्ष असेल.

तपोवन आतील गोदावरी काठी श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात येईल. गोदावरी स्वच्छ करून तिचे तीर्थ म्हणून आचमन करता येईल एवढी शुद्ध करण्यात येईल. आगामी काळात या शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे.

नाशिक शहरातील रस्ते वाहतूक आणि अन्य समस्या आम्ही प्राधान्याने सोडवू. त्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साडेसातशे कोटींचा प्रकल्प तयार केला आहे. यामध्ये द्वारका चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासह रस्ते आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न असेल.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने विकासाचा मेगा प्लान केला आहे. त्यासाठी तीस हजार कोटींचा निधी राज्य सरकार उपलब्ध करुन देईव. आगामी 25 ते 30 वर्षांचा विचार करून नाशिक शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदार भाजपला 100 पार पोचवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यानिमित्ताने शिवसेना आणि मनसे भाजपवर टीकेची झोड उठवत आहे. या सर्व टीकेला महाजन यांनी फारसे गांभीर्याने न घेता आपला स्वतंत्र अजेंडा नाशिक महापालिका निवडणुकीत राबवला आहे. त्या दृष्टीने सिडकोतील सभा प्रचारात टर्निंग पॉईंट ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT