Nashik NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमध्ये मोठे यश मिळवले. त्याची पावती म्हणून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी कौतुकाने शाबासकी दिली. त्याची परतफेड देखील केली. पदाधिकाऱ्यांनी या आठवणी जागवल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. या घटनेने सबंध महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. राज्याची मोठी राजकीय हानी झाली. याबाबत सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी अजित दादांच्या नेतृत्वाच्या आणि माणसे जमविण्याच्या कौशल्याचे स्मरण केले. नाशिकमध्ये शरद पवार यांनी पुलोद स्थापन केल्यावर सर्व १५ आमदार १९८४ मध्ये जिंकल्या होत्या. त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला सात जागा मिळाल्या. या सर्वाधिक होत्या. महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या भाजपला पाच तर शिवसेना शिंदे पक्षाला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ऐतिहासिक कामगिरी केली. सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे अजित पवार विजयी आमदारांच्या कामगिरीवर खुश झाले होते. "शाब्बास पठ्ठ्यानो"या शब्दात त्यांनी त्यांचे कौतुक केले. कालच्या प्रसंगानंतर आमदारांनी त्यांच्या या आठवणी जागवल्या.
या यशाला उपमुख्यमंत्री पवार यांनी दाद दिली. जिल्ह्यात सर्वाधिक छगन भुजबळ, माणिकराव राव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ या तिघांना मंत्रीपदाची संधी दिली. हिरामण खोसकर यांना पक्षाच्या आदिवासी विभागाचे राज्याचे नेतृत्व सोपविले. महायुती सरकारमध्ये नाशिकचे दमदार प्रतिनिधित्व या निमित्ताने झाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठे फेरबदल झाले होते. अनेकांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाला प्रतिसाद म्हणून पक्षात प्रवेश केला. कार्यकर्त्यांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत पक्षाला यश मिळवून दिले होते. यावेळी झालेल्या सभांमधून उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्याच्या सर्वच प्रश्नांना स्पर्श केला होता. सत्तेत आल्यावर त्यावर कार्यवाही देखील सुरू केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.