NCP Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : भाषणावेळी लागली हनुमान चालिसा; भुजबळ पोलिसांना म्हणाले, आवाज कमी करा नाहीतर...

NCP Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणावेळी हनुमान चालिसा लागल्यामुळे त्यांच्या भाषणात व्यत्यय आल्यामुळे त्यांनी मंदिर प्रशासनाला आवाज कमी करण्याची विनंती केल्याची घटना समोर आली आहे.

Jagdish Patil

Nashik News, 15 Sep : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भाषणावेळी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लागल्यामुळे त्यांच्या भाषणात व्यत्यय आल्यामुळे त्यांनी मंदिर प्रशासनाला आवाज कमी करण्याची विनंती केल्याची घटना समोर आली आहे.

तर मंदिर प्रशासनाला आवाज कमी करण्याची विनंती करताना मी सुद्धा बजरंग बलीचा भक्त आहे, हे सांगायला ते विसरले नाहीत. निफाड तालुक्यातील विंचूर येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनानिमित्त छगन भुजबळ आले होते.

त्यांनी आपल्या भाषणातून राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. याचवेळी त्यांचं भाषण सुरू असताना मधूनच लाऊड स्पिकरचा आवाज आला. अचानक आवाज आल्यामुळे भुजबळ (Chhagan Bhujbal) थोडं थांबले आणि आवाज कशाचा आहे? असं त्यांनी विचारलं. त्यावेळी शेजारी असलेल्या एका कार्यकर्त्याने शेजारच्या मंदिरात हनुमान चालिसा लावली असल्याचं सांगितलं. शिवाय या मंदिरात रोज हनुमान चालिसा असते असंही त्याने भुजबळ यांना सांगितलं.

यावर भुजबळ म्हणाले, स्पिकर चालू असेल तर भाषण कसं करायचं. बजरंग बलीला सांगा 'बजरंग बली तोड दुश्मन की नली', मी सुद्धा बजरंग बलीचा भक्त आहे. पण आता पोलिसांनी ताबडतोब दखल घेत आवाज कमी करा, नाहीतर मी भाषण कसं करणार? असं ते म्हणाले. तर भाषण संपताना त्यांनी आपली विनंती पावसाने विनंती आणि बजरंग बलीच्या मंदिर प्रशासनाने देखील माझी विनंती ऐकल्याचं सांगत त्यांनी दोघांचे आभार मानले.

SCROLL FOR NEXT