Nashik News : Tanuja Gholap : Uddhav Thackeray
Nashik News : Tanuja Gholap : Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : ठाकरेंना धक्क्यावर धक्के : उपनेतेपदी असलेल्या दिग्गज नेत्याची कन्या भाजपच्या वाटेवर!

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. ठाकरेंचे निकटवर्तीय व विश्वासातले, शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे वडील ठाकरेंकडे तर पुत्र शिंदेकडे असे चित्र निर्माण झाले. हा धक्का ताजा असतानाच आता ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. आता शिवसेना नेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांची मुलगी तनुजा घोलप भाजपात प्रवेशाची तयारी करत आहेत.

माजी समाज कल्याण मंत्री व शिवसेनेचे बडे नेते बबनराव घोलप यांची कन्या तनुजा शिंदेंचा लवकरच भाजप प्रवेश होणार आहे. आज दुपारच्या दरम्यान हा प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठा तनुजा घोलप या मुंबईच्या दिशेने निघाल्या आहेत. घोलप कुटुंबीयांनी सुद्धा या गोष्टीस दुजोरा दिला आहे. यापूर्वी कालच (दि.१३ मार्च) शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

राज्यातील महत्त्वाचे व शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या पुत्राकडूनच उद्धव ठाकरेंना धक्का बसला होता. यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी, आता नाशिकमध्ये सुद्धा घोलप यांच्याकडून ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

तनुजा घोलप यांनी या पूर्वीच एकनाथ शिंदेच्या गोटात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता त्या भाजपमध्येच प्रवेश करण्यासाठी सरसावल्या आहेत. तनुजा घोलप या यापूर्वी एका वेळेस स्थानिक जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये, तसेच 2017 च्य नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत.

तनुजा यांचे वडील बबनराव घोलप शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे दिग्गज नेते समजले जातात. शिवसेनेत ते अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी ठाकरेंशी निष्ठा राखली आहे आहे. शिवसेनेचे उपनेतेपदही त्यांच्याकडे आहे. युती सरकारच्या काळात ते राज्याचे मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. मात्र आता त्यांच्या कन्या भाजपच्या वाटेवर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT