Himgauri Adke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC Politics: समोर आडके-शिंदे, मागे रिमोट कंट्रोल राजकारण!, नाशिक महापालिकेत ठराविक नेतेच खरे बॉस?

Nashik NMC Politics 2026: महापालिकेच्या नगर विकास विभागात सोयीच्या अन् लाडक्या कर्मचाऱ्यांसाठी ठराविक नेत्यांची सुरू झाली लॉबिंग.

Sampat Devgire

NMC Politics News: महापालिकेत सत्ता कोणत्याही पक्षाची असो. महापौर आणि उपमहापौर कोणीही असो. ठराविक मुरलेली मंडळीच सर्व सूत्रे हलवत असतात. त्याची प्रचिती नाशिक महापालिकेत येऊ लागली आहे.

नाशिक महापालिकेत महापौर हिमगौरी अडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी कारभाराची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे त्यांना कामकाजाची घडी बसविण्यासाठी बराच काळ खर्च करावा लागणार आहे. भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष महापालिकेत सत्तेत आहे.

त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी आणि विशेषता भाजपच्या काही नेत्यांनी आवडत्या आणि सोयीच्या कर्मचाऱ्यांसाठी लॉबिंग सुरू केली आहे. विकास विभाग महापालिकेचा कार्यभार हाकण्यासाठी महत्त्वाचा असतो. या विभागासाठी ६० कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेचा कारभार आणि कामकाज यामध्ये सर्व पक्षांतील काही ठराविक नेतेच पडद्यामागून सर्व सूत्रे हलवत असतात. तुमच्या सोयीनेच महासभेत विषय चर्चेला येतात. महत्वाचे विषय आणि अडचणीचे मुद्दे कसे टाळावेत यासाठी ही मंडळी कळसुत्री बाहुल्या हलवत असतात.

चार वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दी नंतर भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष महापालिकेत सत्तेत आला आहे. महापौर आणि उपमहापौरांनी कार्यभार स्वीकारला. आता सगळ्यांना स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीची उत्सुकता आहे. त्यादृष्टीने नवखे नगरसेवक वर्णी लागावी म्हणून अस्वस्थ आहेत.

यामध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या कामकाजाचे मुख्य सूत्रे नगर विकास विभागातून हलविले जातात. विभागाला महासभेतील कामकाज, ठराव आणि त्याची कार्यवाही याबाबत अधिकार आहेत. त्यामुळे येथे सोयीच्या कर्मचाऱ्यांची बरणी लागावी यासाठी पडद्यामागून काही नेते सक्रिय झाले आहेत. गटनेते, महापौर, उपमहापौर यांपासून पदाधिकाऱ्यांना स्वीय सहाय्यक कोण असावेत यासाठी सूत्रे हलविण्यात येत आहेत.

नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांना नागरिकांच्या विविध समस्यांचा पाठपुरावा करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने प्रभागातील पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती विषय महत्त्वाचे असतात. ही कामे तातडीने मार्गी लागून प्रभागावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पदाधिकारी कामाला लागले आहेत. दुसरीकडे प्रशासनात मात्र कर्मचारी संख्या अपुरी असल्याने या मागण्या कशा पूर्ण कराव्यात हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेली अनेक वर्ष दहा ते बारा नगरसेवक सातत्याने महापालिकेत कार्यरत आहेत. सध्या यातील बहुतांशी नगरसेवक भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात आहेत. त्यामुळे पक्ष कोणताही असला तरी विषय कोणता दामटायचा याचा निर्णय पडद्यामागून हे नगरसेवक करत असतात.

महापालिकेत ठराविक कामाची पद्धत रुजविण्यात आली असून त्यासाठी पडद्यामागून लॉबिंग होते. अनेक नगरसेवक आणि अधिकारी त्याला बळी पडतात, हे लपून राहिलेले नाही. नवे पदाधिकारी कार्यरत झाल्याने दिवसभर महापालिकेत पडून असणाऱ्या या लॉबीला कसे निष्प्रभ केले जाते, याची राजकीय कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT