Sudhakar-Badgujar-Mukesh-Shahane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC Election: बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराबरोबर डान्सचा आरोप; तरी विसरभोळ्या भाजपकडून बडगुजरांच्या घरी तिघांना उमेदवारी?

Nashik NMC Election BJP Girish Mahajan ABP theft Sudhakar Badgujar family three candidates spark controversy-भाजपचा एबी फॉर्म चोरल्याचा अधिकृत उमेदवाराचा आरोप, शहराध्यक्षांचे कानावर हात, निष्ठावंताची उमेदवारीच झाली रद्द!

Sampat Devgire

Sudhakar Badgujar News: निष्ठावंतांना डावलून आयारामांना उमेदवारी देण्याचा विक्रम भाजपने केला. नाशिकमध्ये यातून धक्कादायक प्रकार घडला आहे. एबी फॉर्म चोरी झाल्याचा नवा प्रकार घडला.

भारतीय जनता पक्षाने नाशिक महापालिकेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये बहुतांशी निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी झाल्या.https://www.youtube.com/watch?v=VcNE5gtVx0s

आज मात्र उमेदवारी अर्ज छाननीत धक्कादायक प्रकार घडला आहे. सिडको प्रभागात भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाला. या ठिकाणी ज्यांना उमेदवारी नाही त्या हर्षा बडगुजर यांची भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज मान्य करण्यात आला.

ही घटना कळतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या बाहेर भाजपच्या अधिकृत उमेदवाराने प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे शहराध्यक्ष सुनील केदार यांसह पदाधिकाऱ्यांना धाव घ्यावी लागली. संबंधित घटनेने भाजपच्या शहराध्यक्षांची चांगलीच कोंडी झाली.

काल जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि त्यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. एकच कुटुंबात दोघांना उमेदवारी मिळाल्याने वाद सुरू होता. या वादाने आज धक्कादायक वळण घेतले.

अर्ज छाननीत श्री बडगुजर यांसह त्यांचे चिरंजीव दीपक आणि पत्नी हर्षा या तिघांच्याही अर्जासोबत भाजपचे एबी फॉर्म जोडलेले होते. त्यामुळे एकाच प्रभागात या तिघांनाही भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळाली. भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा मात्र अर्ज बाद झाला.

असाच प्रकार अन्य चार प्रभागातही झाला. त्याच ठिकाणी दोन जणांना एबी फॉर्म दिल्याचे आढळले. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचे ढाबे दणाणले. यातील अनेक उमेदवारांचे भवितव्य संकटात सापडले आहे.

शहराध्यक्ष केदार यांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती आल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल. पक्षाने ज्यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे त्यांचीच उमेदवारी वैध धरली जावी. एबी फॉर्म गहाळ झाला असल्यास त्याची चौकशी करून गंभीर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण दिले.

मात्र एकंदरच निष्ठावंतांना उमेदवारीसाठी डावलेल्याचा गंभीर आरोप भाजपकडे होत आहे. त्यामुळे पक्षात असंतोष पसरला आहे. असे असताना नव्याने पक्षात आलेल्या नेत्याच्या घरात चक्क तिघांना उमेदवारी दिल्याने नवा वाद उफाळून आला आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT