Nashik NMC News: सत्तेच्या अपेक्षेने महापालिका निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले. त्यासाठी शिवसेना एकदाच शिंदे पक्षाने 'सर्व' प्रयोग केले होते. मात्र जनतेने दिलेला कौल आता नवे प्रश्न निर्माण करणार आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला ७२ जागा मिळाल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ठरविलेली रणनीती या निमित्ताने यशस्वी झाली. भाजपची सदस्य संख्या ५७ वरून ७२ झाली आहे.
भाजप पुन्हा एकदा स्वबळावर सत्तेत आला आहे. त्याचे पडसाद महापालिकेच्या आगामी कारभारात उमटताना दिसतील. विशेषतः शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला अवघ्या 26 जागा मिळाल्या. त्यामुळे या पक्षाची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील महायुतीत सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अनेक माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. या पक्षाकडून महापालिकेत सत्ता काबीज करण्याचे मनसुबे जाहीर करण्यात आले होते. त्यादृष्टीने राजकारणात मुरलेली अनेक मंडळी सत्तेची फळे चाखण्यासाठी शिंदे यांच्या पक्षात गेली.
आता मात्र भाजपला बहुमतापेक्षा कितीतरी अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तेत येण्याचे अथवा महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचे शिवसेना शिंदे सेनेचे स्वप्न भंगले आहे. हा पक्ष आता महापालिकेच्या कारभारात भाजपच्या इच्छेवर अवलंबून आहे.
नाशिक महापालिका आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. पूर्वीही नकरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे तसेच शिक्षण मंत्री दादा भोसे यांनी महापालिकेत बैठका घेतल्या. प्रशासनावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
आता मात्र राज्यातील आणि महापालिकेतील दोन्ही सत्तात भाजप पूर्ण बहुमताने आला आहे. विशेषतः आगामी कुंभमेळ्याचे नियोजन या पक्षाने आपल्याकडेच ठेवले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याचे सर्व सूत्रे आणि कामकाज यात कोणालाही सहभागी केलेले नाही, हे बोलके आहे.
या स्थितीत महापालिकेत शिवसेना शिंदे पक्ष सत्तेपासून दूर राहिला आहे. त्यामुळे या पक्षात गेलेल्या अनेक नगरसेवकांची आता कोंडी होण्याची चिन्हे आहेत. विशेषता महापालिकेच्या कारभारात तरबेज असलेल्या अनेकांचे स्वप्न आता बघण्याची चिन्हे आहे. त्या निराशेचे सर्वात मोठे धनी पालकमंत्री पदाची आस लावलेल्या दादा भुसे ठरणार आहेत.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.