Nashik Municipal Corporation results Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MNC Election Result: नाशिकच्या ‘दुबई’ प्रभागात काँग्रेसने आघाडी घेत दाखवली किमया...दोन उमेदवार आघाडीवर!

Two Congress candidates leading in Nashik: ‘त्या’ वॉर्डाला दुबई वॉर्ड का म्हणतात, कोणत्या काँग्रेस उमेदवारांनी घेतली आघाडी यावर लागल्या होत्याशहरात पैजा.

Sampat Devgire

Nashik Election Result News: नाशिक महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटात चुरस आहे. मात्र काही उमेदवारांनी घेतलेली आघाडी चर्चेचा विषय ठरली आहे.

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कॉँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली आहे. बहुतांश उमेदवारांना अपेक्षित मते मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना निवडणुकीत काहीही प्रभाव दाखवता आलेला नाही.

मात्र जुने नाशिक अर्थात मुळ नाशिक असलेल्या भागातील या १४ क्रमांकाच्या प्रभागातील निवडणूक नेहेमीच चर्चेचा विषय असते. येथे वास्तव्य असलेल्या श्रीमंत व दूधाचा व्यवसाय करणाऱ्या अल्पसंख्यांक समाजाच्या ‘कोकणी’ कुटूंबामुळे. या समाजाचे नागरिक प्रामुख्याने प्रतिष्ठेसाठी उमेदवारी करतात.

त्यामुळे ते मतदारांना प्रभाविक करण्यासाठी कोणतीही कसर ठेवत नाहीत. विशेषतः लक्ष्मीदर्शनापासून तर अनेक कल्पक प्रयोग येथे निवडणुकीत केले जातात. यंदाही येथे मतदारांसाठी सर्व गोष्टींची रेलचेल होती. त्याचा प्रभाव निकालात दिसू लागला आहे.

या प्रभाग क्रमांक चौदाच्या मतमोजणीचे कल हाती आले आहेत. त्यात क गटात समिया खान (काँग्रेस) ११२ मतांनी पुढे असून त्यांना ७६१ मते मिळाली आहेत. अन्य उमेदवारांत शिवसेना शिंदे पक्षाच्या रुपाली डहांके ६४९, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या ५८३ मते आहेत.

ड गटात कॉँग्रेसचे माजी नगरसेवक सुफी जीन यांना ११४२ मते आहेत. त्यांनी ६७० मतांची मोठी आघाडी घेतली. अन्य उमेदवारांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुजाहीद हाजी ४७२, अजित पवार पक्षाचे अल्फान हाश्मी यांना ४१९ मते आहेत.

याच प्रभागात अ गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या जागृती गांगुर्डे ९०९ मते घेऊन २४५ मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे दिगबरं नाडे ६६४ मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ब गटात अपक्ष कस्तुरी हिरवे यांनी ८६३ मते घेत ४३ मतांची निसटती आघाडी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुशरा शेख यांना ८२०, काँग्रेसचे नाझीया अत्तार यांना ७०८ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेविका समीना मेमन यांना २६८ मते मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT