Shivsena UBT News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena UBT Politics: उद्धव ठाकरेंचा आक्षेप खरा ठरला; महापालिके विरोधात विरोधक एकवटले!

Shivsena UBT Politics Uddhav Thackeray’s Claim Proved Right : उद्धव ठाकरेंचा आक्षेप खरा ठरला असून महापालिकेविरोधात विरोधक पुन्हा एकत्र आले आहेत.

Rashmi Mane

NMC Election News: महापालिका निवडणुकीत मतदार याद्यांचा गोंधळ गाजू लागला आहे. या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने गंभीर आक्षेप घेतले. त्यानंतर आता विरोधकही खडबडून जागे झाले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहेत. हजारो नवे तर लाखो मतदारांना त्याचा फटका बसणार आहे. या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महापालिकेला गंभीर इशारा दिला.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महापालिकेच्या मतदार यादीवर आक्षेप नोंदवले. यादी दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये असा इशारा दिला. प्रशासनाचा हा घोटाळा उघड झाल्याने इतर पक्षांची ही धावपळ उडाली. काल या संदर्भात शिवसेनेने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुरावे सादर केले. मतदार यादीविषयी घेण्याबाबत सात दिवसांची मुदत अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले. ही मुदत वाढविण्याचे मागणी केली.

आता सर्वच राजकीय पक्ष खडबडून जागे झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांसह विविध पक्षांनी शिवसेनेच्या या मागणीला पाठिंबा दिला. आज या नेत्यांनी संयुक्तपणे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन दिले.

मतदार यादीतील गोंधळ नवा नाही. या संदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने ही तक्रार केली होती. विविध संघटनांनी यावर आक्षेप नोंदविले आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या मागणीला बळ मिळाले.

मतदार यादीचा गोंधळ चर्चेत असला तरी काँग्रेस पक्ष यावर मौन आहे. यासंदर्भात पक्षाच्या नेत्यांनी शहर अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांविषयी संताप व्यक्त केला आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेस लढाई आधीच शरण गेल्याची स्थिती आहे.

मतदार यादी आणि त्यातील त्रुटी याबाबत विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन देखील सतर्क आहे. आता मतदार यादीतील गोंधळ कसा दूर केला जातो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT