Sandeep Karnik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC Election : नाशिक पोलिस आयुक्तांचे चोख नियोजन, 'काही अनुचित घडलं तर अवघ्या 'पाच' मिनिटांत पोहोचणार फोर्स

Nashik Police Commissioner : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी खबरदारी घेतील जात असून स्वत:पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मतदारांना निर्भयपणे मतदानाचे आवाहन केले आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीच्या 31 प्रभांगासाठी गुरुवारी (ता. 15) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान त्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, निवडणूक प्रक्रियेला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष खबरदारी घेतली आहे. शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला असून पोलिस ‘अलर्ट मोड’वर आहेत.

कुठेही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास अवघ्या पाच ते सात मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहचतील व परिस्थिती नियंत्रणात आणतील असे नियोजन करण्याची माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांन दिली आहे. यासाठी शहरभर आयुक्तालयाचे 37 स्ट्रायकिंग फोर्सची सज्जता केली आहे.

काही अनुचित घडू नये यासाठी पोलिसांची गस्तीपथके शहरभर गस्तीवर असून करडी नजर ठेवली जात आहे. मतदान केंद्रांच्या आतील व बाहेरील बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिस, दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) तैनात केले आहेत. शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील परिसर, वादग्रस्त परिसरात अतिरिक्त बंदोबस्त कार्यरत केला आहे. याशिवाय सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. (Nashik Politics )

दरम्यान आयुक्तालय हद्दीतून 519 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तर 800 गुन्हेगारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आलेले आहेत. आयुक्तालय हद्दीतून गावठी कट्टे, कोयते तलवारी जप्त करण्यात आले आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा. कोणीही कुणाच्याही दबावाला बळी पडू नये. जर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर थेट बंदोबस्तावरील जवळच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावे, असे आवाहन आयुक्त कर्णिक यांनी केले आहे.

शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांचे व बूथचे मॅपिंग करण्यात आले आहे. आयुक्तालय हद्दीतील 44 संवेदनशील मतदान केंद्रांसह बुथवर विशेष लक्ष केंद्रीत करून बंदोबस्त तैनात केला आहे. 111 ठिकाणांवर पोलिस गस्ती वाहनांमार्फत ‘सेक्टर पेट्रोलिंग’ केली जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. 36 स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT