Nashik Police Constable Sentenced in Bribery Case : दाखल गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलिस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे प्रकरण एका हवालदाराला चांगलेच भोवले. १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या पोलिस हवालदार रामचंद्र राजाराम अडके यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविले असून, त्यांना चार वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
नाशिक तालुका पोलिस ठाण्यात २०१४ मध्ये तक्रारदार आणि त्यांच्या चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलिस कोठडी न घेता दोघांना थेट न्यायालयात हजर करण्यासाठी अडके यांनी २३ सप्टेंबर २०१४ रोजी पंचांसमक्ष १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे ठरले.
ठरल्यानुसार, गिरणारे पोलिस चौकी येथे २४ सप्टेंबर २०१४ रोजी पंचांसमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ने अडके यांना रंगेहाथ पकडले. पदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात खटला चालला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सचिन गिरवाडकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पुरावे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने अडके यांना चार वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अनुक्रमे तीन आणि चार महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
पोलिस निरीक्षक विकास लोंढे, कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे, प्रभाकर गवळी आणि किरण धळे यांनी खटल्याचा पाठपुरावा केला व कामकाज पाहिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.