Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News : संजय राऊत अडचणीत, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

Sampat Devgire

Sanjay Raut News : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पोलिस व प्रशासनाला अयोग्य चिथावनी दिल्याच्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात येथील मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरूद्ध उद्दव ठाकरे शिवसेनेतील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. (MP Sanjay Raut made a statement on SC verdict and not to obey the orders of illigal state Government)

शिवसेना (Shivsena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) दोन दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) राजकीय भूमिकेतून कार्यकर्ते व शिवसेना नेत्यांना त्रास देत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सरकार (Eknath Shinde) अवैध पद्धतीने सत्तेत आले आहे, असे निरीक्षण नोंदविले आहे, असे म्हटले होते.

या संदर्भात मुंबई नाका पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार केदारे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंड विधान कलम ५०५/१ (ब) अन्वये पोलिसांप्रती अप्रितीची भावना चिथावने (कायदा १९२२) अन्वये हा गुन्हा दाखल झाले. शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी राज्यातील सरकारचे आदेश पाळू नयेत, असे आवाहन पोलिस व प्रशासनाला केले होते. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा जामीनपात्र आहे.

यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मी सांगतो आहे की, हे सरकार अपात्र आहे. ते जाणार आहे. मी पुनरूच्चार करतो बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश कोणत्याही अधिकाऱ्यांनी पाळू नये. तुम्ही अडचणीत याल, तुमच्यावर खटले दाखल होती. शिंदे फडणवीस काहीही म्हणू द्या, पोपटला काहीही म्हणू द्या, हे सरकार जाते आहे, असे म्हटले होते.

काय म्हणाले होते राऊत....

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत, सर्वोच्च न्यायालयाची जी लक्ष्मण रेषा आहे ती डावलून त्यांना पुढे जाता येणार नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. हेसरकार तीन महिन्यात जाणार. या सरकारचा मृत्यू अटळ आहे, आणि म्हणून या राज्यातील प्रशासन आणि पोलिसांना माझे आवाहन आहे की, त्यांनी बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका. तुम्ही अडचणीत याल. बेकायदासरकारचे बेकायदा आदेश जर पाळाल तर तुम्ही अडचणीत याल. आतापर्यंत या सरकारने गेल्या नऊ महिन्यात घेतलेले सर्लव आदे। बेकायदेशीर आहेत. राजकीय कार्यकर्त्यांवर अनेक कारवाया केल्या आहेत. अगदी दाद भुसे यांच्यापासून सगळेच नेते असे म्हणतो मी म्हणतो आहे. सत्तेचा गैरवापर करू नका, कारण तुम्हालाही त्याच मार्गाने जावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT