Womens in the que for voting In Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Election Voter Turnout: पालकमंत्री दादा भुसे, मंत्री भुजबळांच्या मतदारसंघात मतदान संथ

Dada Bhuse constituency slow voting: जिल्ह्यात शांततेत मतदान सुरू असून पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात संथ तर माजी खासदार समीर भुजबळ उमेदवार असलेल्या नांदगावला सर्वात कमी मतदान

Sampat Devgire

Assembly Voting News: नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत सुरू आहे. नाशिकमध्ये आणि नांदगाव मतदार संघात संवेदनशील केंद्रांवर सशस्त्र दलाचा बंदोबस्त आहे. मतदानाचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी संथ असल्याचे दिसले.

आज सकाळी सातला नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात मतदानाला प्रारंभ झाला. मतदान शांततेत आणि सुरळीत व्हावे यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. प्रदान केंद्रांवर जाताना मतदारांना मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. विशेष पथकाकडून याबाबत खास दक्षता घेण्यात येत आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांना भेटी देत माहिती घेतली. निवडणूक आयोगाकडूनही मतदानावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. संवेदनशील आणि आमदार सुहास कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ उमेदवार असलेल्या मतदार संघात पहिल्या दोन तासांत कमी मतदान झाले. देवळातीमध्ये सर्वात कमी 4.42 टक्के मतदान झाले.

संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मतदार संघात मतदानाचे प्रमाण अतिशय कमी आणि संथ असल्याचे दिसून आले. येथे सकाळी नऊ वाजेपर्यंत अवघे 6.93 टक्के मतदान झाले. आमदार सुहास कांदे माजी खासदार समीर भुजबळ आणि अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे हे येथे उमेदवार आहेत दिंडोरी मतदार संघात सर्वाधिक ९.७१ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात महिलांचे मतदान कमी तर पुरुषांचे सर्वाधिक टक्के मतदान झाले.

जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ निहाय सकाळी सात ते नऊ या कालावधीत झालेले प्रधान असे (टक्के), नांदगाव ४.९२, मालेगाव मध्ये 9.98, मालेगाव बाह्य 6.30, बागलाण 8.91, कळवण 8.91, चांदवड 6.49, येवला 6.58, सिन्नर 8.09, निफाड 5.40, दिंडोरी 9.1, नाशिक पूर्व 6.43, नाशिक मध्ये 7.55, नाशिक पश्चिम 6.25, देवळाली 4.42 आणि इगतपुरी 6.85 जिल्ह्यात सरासरी 6.93 टक्के मतदान झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT