Nashik Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आज मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होतो आहे. बडगुजर यांच्यासह अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसणार आहे.
तर दुसरीकडे भाजपचा हा पक्षप्रवेशसोहळा पार पडण्याआधीच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. नाशिकच्या चार माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेनेने उद्धव ठाकरे यांचा पक्ष खिळखिळा करण्याचे काम चालवले आहे. एकापाठोपाठ एक नेते, पदाधिकारी गळाला लावले जात आहेत. बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप हे देखील भाजपमध्ये जात आहेत. त्यानंतर आता चार माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.
त्यामध्ये किरण दराडे, सीमा निगळ, पुंडलिक अरिंगळे, पुंजाराम गामने यांनी आज शिवबंधन सोडून शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे चारही नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले.
नाशिक महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थिती भाजपला सत्ता आणायची आहे. त्यासाठी भाजपने उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील बडे चेहरे हेरले आहेत. त्यांचा पक्षप्रवेश आज होणार आहे. भाजपाठोपाठ शिवसेनेनेही पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनेकडूनही इन्कमिंगवर मोठा जोर दिला जातो आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवणार असले तरी वेळप्रसंगी स्वबळावर लढावं लागलं तरी त्यासाठी दोन्ही पक्षांनी आपआपले पक्ष मजबुत करण्याचे काम सुरु केलं आहे.
नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आतापर्यंत नाशिक महानगरपालिकेतील 20 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर पुढील आठवड्यात आणखी काही माजी नगसेवक प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मागेच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती ही गळती रोखण्यासाठी मोठे शिबीर नाशिकमध्ये पार पडले. पण या शिबिरानंतरही पक्ष गळती थांबलेली नाही. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे सत्ताधारी गोटात जात असल्याने त्यांना थांबवण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर उभे ठाकले आहे.
या गळतीमुळे नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद कमी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र खासदार संजय राऊत यांनी आजूनही नाशिकमध्ये शिवसेना जागेवर असल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.