Currency Notes seezed Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics: सत्ताधारी नेत्याच्या गाडीत 1.98 कोटींची रोकड; तारांकीत हॉटेलच्या खोलीत चार तास तपासणी !

1.98 crore cash seized from ruling leader's car: नाशिकच्या एका तारांकित हॉटेलमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या गाडीत आणि हॉटेलच्या खोलीत घबाड सापडले.

Sampat Devgire

Maharashtra Assembly Election 2024: मतदान दोन दिवसांवर आले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सक्रिय असून विविध तपास विभाग काम करीत आहेत. आज नाशिकमध्ये एका तारांकित हॉटेलच्या खोलीत आणि राजकीय नेत्याच्या गाडीत कोट्यावधी रुपये सापडल्याची चर्चा सुरू आहे.

आज सकाळी नाशिक येथील रेडिसन या तारांकित हॉटेलच्या पोर्चमध्ये उभ्या असलेल्या टोयाटो एंडेव्हर या आलिशान गाडीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यावेळी या गाडीत आलेल्या नेत्यावर संशय होता. मात्र तपासणीत त्याच्याकडे काहीही सापडले नाही. त्यामुळे संबंधीत गाडी व नेत्याला तपास अधिकाऱ्यांनी सोडले. एका बागेमध्ये पाचशे बंडल असल्याचे आढळले. ही रक्कम काही लाखांची होती. दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम असल्याने नियमाप्रमाणे प्राप्तिकर विभागाला प्राचारण करण्यात आले.Raj Thackrey Politics: राष्ट्रवादीचा टोला, "शरद पवार समजणे राज ठाकरेंच्या क्षमते पलीकडचे"

पोलिसांसह या विभागाने तपासणी केली असता, या बॅगेत काही रक्कम सापडली. याशिवाय संबंधित नेत्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या नावाने ह़टेलमध्ये खोली आरक्षीत होती. या तपासणीत 1.98 कोटी रुपये आढळले.संबंधित नेता जयंत साठे हा सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जाते. प्राप्तिकर विभागाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सध्या चार तासांपासून हॉटेलच्या खोलीमध्ये तपासणी सुरू आहे. चार तासांपासून आठ ते दहा अधिकारी हे काम करीत असून ते अद्याप हॉटेलच्या पॅसेज मध्ये आलेले नाहीत. राजकीय कार्यकर्त्यांसह पत्रकारही त्यांची प्रतीक्षा करीत ताटकळत थांबले आहेत. मात्र पक्षाच्या नेत्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

निवडणुकीच्या दोन दिवस आधी हे पैसे सापडल्याने तो चर्चेचा विषय आहे. हे पैसे देवळालीच्या एका उमेदवाराशी संबंधित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांत एकच खळबळ उडाली आहे. यातील एक वाहन सत्ताधारी पक्षाच्या नाशिकच्या माजी लोकप्रतिनिधीची असल्याचे बोलले जाते.

नाशिक विभागात विविध यंत्रणांनी निवडणूक विभागाच्या मार्गदर्शनाखाली तपासणी आणि विविध कार्यवाही केली आहे. यामध्ये आतापर्यंत ७३.६० कोटी रुपयांची रोकड दागिने दारू आणि अन्य मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत नाशिक विभागात 17.24 कोटी रुपयांची रोकड आणि अन्य माल ताब्यात घेण्यात आला आहे.

कारवाईत 13.93 कोटींची दारू आणि 28 कोटींचे सोने आणि अन्य मौल्यवान दागिने आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 9.95 कोटी, धुळे जिल्ह्यात 19.35 कोटी, जळगाव जिल्ह्यात 8.90 कोटी आणि नंदुरबार जिल्ह्यात 4.17 कोटी असे 31.31 कोटी रुपयांची रोकड यंत्रणांच्या हाती लागली आहे. ही रोकड विविध राजकीय नेते आणि उमेदवारांची संबंधित असल्याचे बोलले जाते त्याबाबतचा तपास सुरू आहे.

निवडणुकीच्या दोन दिवस आधी मोठे घबाड यंत्रणेच्या हाती लागले. या कालावधीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध आमिषे दाखविले जातात. त्यात दारू आणि पैशांचे वाटप सर्रास होते. या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये रोकड सापडल्याने अन्य उमेद्वारही सावध झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT