Sudhakar Badgujar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sudhakar Badgujar : बडगुजरांच्या प्रवेशाबाबत मुंबईतून मध्य रात्रीच आला आदेश, नाशिकमध्ये फोन खणाणला, नक्की काय घडलं?

Midnight call from BJP leaders finalizes Sudhakar Badgujar’s entry; Sunil Kedar reveals what happened behind the scenes: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे आज (मंगळवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मोठे शक्तीप्रदर्शन करत ते मुंबईत पोहचले आहेत.

Ganesh Sonawane

Sudhakar Badgujar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आज (मंगळवार) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यासाठी सकाळीच ते शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले होते. मोठे शक्तीप्रदर्शन करत ते मुंबईत पोहचले. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला.

मात्र सुधाकर बडगुजर यांच्या या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. आमदार सीमा हिरे यांनी देखील या पक्षप्रवेशाला विरोध कायम असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पक्षप्रवेशाबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. त्यामुळे बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र याबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

काल रात्री उशीरा पक्षश्रेष्ठींच्या झालेल्या बैठकीत सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही त्याची माहिती नव्हती असं सांगितलं जात आहे. भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी त्यासंदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या पक्ष श्रेष्ठींकडून मध्यरात्री बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशासाठी मुंबई प्रदेश कार्यालयात पोहचण्याचा निरोप आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते विजय साने हे बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशासाठी मुंबईला रवाना झाले होते.

दरम्यान भाजप आमदार सीमा हिरे यांनी मात्र बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल आपल्याला काही माहिती नाही. परंतु बडगुजर यांना आपला विरोध कायम असल्याचे म्हटले आहे. हिरे यांनी यापूर्वीही बडगुजर यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत त्यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला होता. त्यांनी बडगुजर यांना पक्षात घेऊ नका, त्यांच्यावर १७ गुन्हे दाखल असून त्यांना पक्षात घेतल्यास पक्षाची प्रतिमा मलिन होईल असे म्हटले होते. आताही देशद्रोही व बंडखोरांसोबत काम करणं अवघड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्यासोबत बबन घोलप, अशोक मुर्तडक आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी आपल्याला या पक्षप्रवेशाबाबत काहीही कल्पना नाही असे म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील यावेळी उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपमध्ये हे एक मोठे इन्किमिंग आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT