Nashik politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर आणि भाजपच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्यात सध्या अंतर्गत संघर्षाचे वातावरण दिसून येत आहे. "एकाच म्यानात दोन तलवारी राहत नाहीत," अशी चर्चा आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सीमा हिरे यांनी विधानसभा निवडणुकीत बडगुजर यांचा पराभव केला होता. दोघांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे हिरे यांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता. मात्र भाजपने आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करता सीमा हिरे यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करुन बडगुजर यांना पक्षात घेतलं. एकमेकांचे कट्टर विरोधक एकाच पक्षात आल्याने आगामी काळात यांच्यातील संघर्ष भाजपचीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमदार सीमा हिरे या आपल्या कन्येला महापालिकेच्या निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे. बडगुजर यांच्यामुळे यात अडथळा आल्यास दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय प्रभाग वाटप, वर्चस्व राखणे आणि कार्यकर्त्यांचे नेतृत्व हे मुद्दे बडगुजर आणि हिरे यांच्यातील संघर्षाचे केंद्रबिंदू ठरू शकतात. भाजपसाठी दोघांमधील संघर्ष डोकेदुखीचे ठरू शकतो, कारण दोघेही महत्वाचे चेहरे असून स्थानिक पातळीवर स्वतःची ताकद सिद्ध करत आले आहेत.
आणखी पुढचा विचार करायचं झालं तर दोघांचे विधानसभेचे मतदारसंघ एकच असल्याने दोघांमध्ये उमेदवारीवरून संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे. सीमा हिरे यांचा पक्षातील गट आणि जुने कार्यकर्ते यावर मजबूत प्रभाव असून बडगुजर यांनीही आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे, शिवाय ते आता भाजपात आल्याने युतीचे गणितच गडबडू शकते.
महापालिका निवडणुकीच्या वेळेलाही पावला-पावलावर वेगवेगळ्या मुद्यांना घेऊन दोघांमध्ये सामना होऊ शकतो. दोघांनाही त्यांच्या समर्थकांसाठी जास्तीत जास्त प्रभागात तिकिटं हवी असतील. प्रदेश नेतृत्वाकडे कुरापती, तक्रारी, इशारे देण्याचे प्रयत्न होऊ शकतात. निवडणुकीनंतर कोणत्या विकासकामाचं श्रेय कोणी घ्यायचं यावरून संघर्ष होऊ शकतो. पोस्टरबाजी, सोशल मीडियावर कुरघोडी, अंतर्गत नाराजीसारखे प्रकार संभवतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.