MLA Bacchu kadu
MLA Bacchu kadu Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bachchu Kadu News: कायद्याचा गैरवापर होत असल्याने लक्षवेधी मांडणार!

Sampat Devgire

Nashik News: महापालिका (NMC) आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारणे माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu kadu) यांना चांगलेच महागात पडले आहे. नाशिकच्या सत्र न्यायालयाने (Session Court) त्यांना या प्रकरणात शासकीय कामकाजा अडथळा प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली (Police) आहे. दिव्यांगांच्या प्रश्नावर झालेले हे आंदोलन मारहाणीमुळे राज्यभर गाजले होते. या कलमाचा गैरवापर होत असुन त्याबाबत आपण विधानसभेत लक्षवेधी मांडणार असल्याचे ते म्हणाले. (Court sanction interim bail for Bachchu kadu after sentenced)

दरम्यान विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असले तरीही आमदार कडू या सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांना शिक्षा सुनवल्यावर लगेचच सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांना हंगामी जामीन मंजुर केला आहे.

नाशिक महापालिकेत 2017 मध्ये ही घटना घडली होती. दिव्यांगांच्या प्रश्नावर प्रहार संघटनेतर्फे त्यांनी आंदोलन झाले होते. दिव्यांगांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी गांभिर्याने होत नाही. त्यांच्यासाठी आलेला निधी का खर्च होत नाही. दिव्यांगांनी केलेल्या पत्रव्यावहाराला प्रतिसाद दिला जात नाही, अशा विविध तक्रारी होत्या. दिव्यांगासाठी आलेला काही निधी महापालिकेने खर्च न केल्याने तो शासनाला परत गेला होता. त्यावर आंदोलक आक्रमक झाले होते.

यासंदर्भात महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या चर्चेत वाद-विवाद झाले. यावेळी पत्रकारांसह महापालिका कर्मचारी देखील उपस्थित होते. त्यात तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा उत्तराने समाधान न झाल्याने कडू यांनी आयुक्तांवर हात उगारला होता.

महापालिका आयुक्तांवर हात उगारल्याने त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानुसार शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची अंतीम सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. त्यात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.

यासंदर्भात श्री. कडू यांनी माध्यमांशी बोलताना, भा. द. वि. 353 या शासकीय कामकाजात अडथळा या कलमाचा गैरवापर केला जात आहे. हा गंभीर प्रश्न झाला आहे. जनतेच्या प्रश्नावंर आंदोलन करणारे, त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्याचा त्रास होतो. याउलट काही शासकीय अधिकारी या कायद्याचा बचाव म्हणून वापर करतात ही खेदाची बाब आहे.

सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा या कायद्याचा जो गैरवापर होतो आहे, त्याकडे मी विधीमंडळाचे लक्ष वेधणार आहे. त्यासाठी लक्षवेधी मांडण्याचा माझा विचार आहे. त्याबाबत लवकरच कार्यवाही करीन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT