Dy. Leader Baban Gholap in Shivsena Meeting.
Dy. Leader Baban Gholap in Shivsena Meeting. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena: `या` मुळे दसरा मेळाव्यात दिसणार नाशिकची ताकद!

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनेतर्फे (Shivsena) मुंबईत (Mumbai) शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातून २५ हजार शिवसैनिक (Shivsena followers) नेण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची माहिती उपनेते व माजी मंत्री बबन घोलप (Baban Gholap) यांनी दिली. दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. (Shivsena took a meeting for mumbai rally prepration in Nashik)

शिवसेनेचा हा दसरा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यामागेच राज्यातील सर्व शिवसैनिक खंबीरपणे उभे असून शिवतीर्थावर त्याचे दर्शन घडेलच, असे उपनेते सुनील बागूल म्हणाले. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्षपदावर नियुक्त झालेल्यांना गावातील ग्रामपंचायत जिंकता आली नाही ते जिल्हा काय सांभाळणार, अशा शब्दांत बागूल यांनी तांबडे यांच्यावर सडकून टीका केली. शिंदे सेनेमागे कार्यकर्त्यांचे काहीही पाठबळ नाही.

शिवसेनेच्या शिवतीर्थावरील मेळावा न भूतो न भविष्यती असा होईल आणि कट्टर शिवसैनिक विशाल गर्दीने गद्दारांना त्यांची जागा दाखवून देतील, असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी आमदार वसंत गिते यांनी सांगितले. पदाधिकारी, लोकप्रतिनीधी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपनेते सुनील बागूल, संपर्कप्रमुखपदी जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, कुणाल दराडे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, गटनेते विलास शिंदे, जगन आगळे, माजी आमदार योगेश घोलप, युवासेना जिल्हाधिकारी दीपक दातीर, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, श्यामला दीक्षित आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT