Girish-Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kumbh Mela Politics: कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सुसाट; पर्यावरणप्रेमींना आव्हान देत शहरभर वृक्ष लागवड जोमात!

Nashik Simhastha Kumbh Mela Tree Cutting Environment Girish Mahajan Replies Environment Lover Tree Planting Initiative-तपोवनातील वृक्षतोडीवर काढला रामबाण; गिरीश महाजन यांनी पर्यावरण प्रेमींना थेट वृक्ष लागवड करीत दिले उत्तर

Sampat Devgire

Girish Mahajan News: सिंहस्थ कुंभमेळा साधूग्राम उभारणीसाठी सतराशे झाडे तोडण्यात येणार होती. यावरून राजकारण पेटले होते. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एकतर्फी टीका सुरू होती.

वृक्षप्रेमींनी साधूग्राम उभारणीसाठी वृक्ष तोडीला प्रखर विरोध केला होता. वृक्षप्रेमींच्या आंदोलनाचा रोग प्रामुख्याने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात होता. त्याला नाशिक मधील राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊन राजकारण तापवले होते.

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे वातावरण भाजपची अडचण करणारे होते. महायुतीचा घटक असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षासह मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस यांसह विविध पक्ष मैदानात उतरले होते. हा भाजपची राजकीय कोंडी करण्याचाच प्रयत्न होता.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र पर्यावरण आंदोलनाला उत्तर दिले आहे. थेट प्रदर्शन सेंटरची निविदा रद्द करण्यात आली. तपोवनातील सर्व झोडे तोडणार नाही, ही भूमिका घेतली. शहरात वाढ झालेली पंधरा हजार झाडे लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेने आता चांगलीच गती घेतली आहे.

पंचवटी येथे सात एकरात एनआयटी महाविद्यालयाच्या पुढाकाराने दोन हजार झाडे लावली. ‘नरेडको’ गृह प्रदर्शनात शहरभर झाडे लावण्याची मोहीम महाजन यांनी जाहीर केली. आता थेट पन्नास हजार झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. तपोवन आतील झाडे तोडण्यास साधुसंतांनी सहमती व्यक्त करीत महाजन यांना बळ दिले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "आपलं नाशिक हरित नाशिक"ही मोहीम जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे बांधकाम व्यवसायिकांच्या ‘नरेडको’ गृहप्रदर्शनात वेगळीच घोषणा देण्यात आली.

या प्रदर्शनाला जेवढे नागरिक भेट देतील तेवढी झाडे बांधकाम व्यवसायिक आपल्या प्रकल्पांमध्ये लावणार आहेत. या सर्व चर्चेत पर्यावरण वाद्यांचे आंदोलन मागे पडताना दिसते. त्यामुळे महाजन यांची वृक्ष लागवड एक्सप्रेस सुसाट निघाली आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT