Nashik TCS case Nida Khan bail application update Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik TCS Case : फरार निदा खानचा जामीन अर्ज रखडला, अटकेची टांगती तलवार कायम ; तिच्या वकिलांचा युक्तिवाद कोर्टात अमान्य

Nida Khan Bail Plea: निदा खान ही फरार असून एसआयटीचे पथक तिच्या मागावर आहेत. वकिलांच्या मार्फत तीने अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न केला पण न्यायालयाने तिला कोणताही दिलासा दिला नाही.

Ganesh Sonawane

Nida Khan Bail: नाशिकमधील TCS या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत घडलेल्या कार्पोरेट जिहाद व महिलांचे लैगिंक शोषण प्रकरणात पोलिसांकडून शोध सुरु असलेली संशयित आरोपी निदा खान हिच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. तिचा अटकपूर्व जामीन मंजूर नाशिकरोड न्यायालयाने मंजूर करण्यास नकार दिला.

निदा खान ही फरार असून पोलिस तिच्या मागावर आहेत. अशात तीने वकिलांमार्फत नाशिकरोड कोर्टात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सोमवारी (दि. २०) न्या. के. जी. जोशी यांच्यासमोर इन कॅमेरा सुनावणी झाली.

निदाचे वकील राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद करताना, ‘निदा खान ही गर्भवती असून, तिला नोकरी गमवावी लागल्याने ती तणावात आहे. तिने जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावलेल्या नसून, जामीन मिळाल्यास ती पोलिसांना तपासात सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचा युक्तिवाद निदाच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला.

तसेच याप्रकरणात तिचा काहीही संबंध नाही. ती कंपनीची एचआरही नव्हती. माडियाच्या दबावामुळे तिला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे. तसेच तिच्या संरक्षणाचाही प्रश्न आहे असा युक्तिवाद करत तिला अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी ॲड. कासलीवाल यांनी केली. मात्र तो कोर्टाने नाकारला.

या मुद्द्यावर सरकारी पक्षाच्या वकिलांना आपली बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतला. या गुन्ह्याचे गांभीर्य अधिक असून बलात्कार व अॅट्रोसिटीची कमले आहेत. त्यामुळे पीडित तरुणी, तपासी अधिकारी, आणि सरकारपक्षाचे म्हणणे ऐकुन घेण्यात यावे असा अर्ज देण्यात आला.

दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकुन घेतल्यानंतर कोर्टाने तिच्या अटकपूर्व अर्जावर येत्या २७ तारखेला सुनावणी होईल तेव्हा निकाल देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे निदा खानला कोर्टाने कोणतेही संरक्षण न दिल्याने तिच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.

TCS या आयटी कंपनीतील मुस्लीम धर्मीय संशयितांनी पीडितेवर अत्याचार करीत तिचे लैंगिक शोषण केले. तर, संशयित निदा खान हिने पीडितेच्या धार्मिक भावना दुखावत तिचा धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल आहे. एसआयटी पथकाने संशयित दानिश इजाज शेख (वय ३०), तौसिफ बिलाल अत्तर (३८, दोघे रा. मुंबई नाका) यांना या प्रकरणी आधीच अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

याच प्रकरणातील संशयित प्रोसेस असोसिएट निदा खान पसार असून एसआयटीची पथके तिच्या मागावर आहेत. न्यायालयाने तिला अद्याप कोणतेही संरक्षण न दिल्याने व जामीनाव सुनावणी न केल्याने आजूनही फरार निदा खानला अटक करुन तिची चौकशी करण्याची संधी एसआयटी पथकाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT