Nida Khan IN Police Custody Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nida Khan Custody : पोलिस कोठडीत निदाला भेटू शकेल तिची आई, कोर्टाने परवानगी दिली ; सरकारी पक्षानेही हरकत घेतली नाही, काय कारण?

Nashik TCS Case Nida Khan Police Custody : निदा खानला नाशिक पोलिसांनी संभाजीनगरमधून ताब्यात घेतलं. नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता तिला ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Ganesh Sonawane

TCS conversion case Nashik : नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीतील महिलांचे लैगिंक शोषण व धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अखेर महिनाभराच्या शोधमोहिमेनंतर नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून अटक केली. त्यानंतर शुक्रवारी (दि. ८) तिला नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सोमवार (दि. ११) पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणाची संवेदनशीलता पाहाता नाशिक रोड न्यायालयात 'इन कॅमेरा' सुनावणी घेण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकुन घेतल्यानंतर निदाला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. निदा खान ही गर्भवती असल्याने पोलिस कोठडीत तिच्या आईला सकाळ-संध्याकाळ असे दोन वेळा भेटण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. निदाच्या वकिलांमार्फत तशी मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार न्यायालयाने निदा खान गर्भवती असल्याची नोंद घेत तिच्या आईला दिवसातून दोन वेळा भेटण्याची परवानगी देत आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. दरम्यान निदा गरोदर असल्याने यावर सरकारी पक्षानेही हरकत घेतली नाही. अशी माहिती सरकारी वकिल अजय मिसर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

...पोलिसांनी घेतली खबरदारी

निदाला संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिला घेऊन पोलिस खासगी वाहनातून नाशिककडे येत होते. परंतु, निदाने यापूर्वी गर्भवती असल्याचे कारण देत नाशिकरोड न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यातून कोणताही कायदेशीर गुंता निर्माण होवू नये याची काळजी घेण्याची सूचना पोलिसांना नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. म्हणून पावणे दहाच्या सुमारास नाशिकचे पथक समृद्धी महामार्गाच्या अलिकडून पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये माघारी फिरले.

निदाला गारखेडा परिसरातील एका न्यायाधिशांच्या निवासस्थानी नेऊन तिचा ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आला. त्यानंतरच पुढील कारवाईसाठी नाशिककडे रवाना करण्यात आले. संशयित महिला असल्याने सूर्यास्तानंतर अटक केली जाते. त्यानुसार कायदेशीर तरतुदींचे काटकोरपणे पालन करुन मगच निदाला नाशिकला आणण्यात आलं.

सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी निदाच्या पोलिस कोठडीची मागणी नाशिक न्यायालयाकडे केली. निदा खानने पीडितेला धर्मांतरासाठी सातत्याने प्रवृत्त केल्याचा दावा त्यांनी कोर्टासमोर केला. पीडितेला बुरखा देणे, नमाज व हिजाबबाबत मार्गदर्शन करणे, धार्मिक प्रभाव टाकणे आणि तिचे नाव बदलून ‘हनिया’ ठेवल्याचे तपासात समोर आल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

तसेच अनुसूचित जातीच्या पीडितेला मलेशियात इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पाठविण्याचा कट निदा खानने रचला होता असा संशय सरकार पक्षाने व्यक्त केला. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता तपासली जात असल्याचेही न्यायालयात नमूद करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा फरार होती. ती कुठे राहत होती. तिला कोणी आश्रय दिला व मदत केली याचा तपास बाकी असल्याचं वकिलांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT