Nashik TCS case Nida Khan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik TCS Case : TCS धर्मांतर प्रकरणात पहिलं राजकीय कनेक्शन उघड ; निदा खानला आश्रय देणारा MIM नगरसेवक पोलिसांच्या रडारवर

MIM corporator Matin Patel : निदा खान कौसर पार्क येथील मतीन पटेल यांनी खरेदी केलेल्या एका घरात कुटुंबासह लपून बसली होती. नाशिक पोलिसांनी पटेल यांना नोटीस बजावली आहे.

Ganesh Sonawane

Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीतील हिंदू महिलांचे लैगिंक शोषण व धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील पहिलं राजकीय कनेक्शन समोर आलं आहे. गेल्या दीड महिन्यांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मतीन पटेल पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिल्याचा आरोप होत असून नाशिक पोलिसांनी पटेल यांना नोटीस बजावली आहे. तसेच मोबाईल जप्त केला आहे. मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन घर विकत घेतले होते. याच घरात निदा खानला ठेवण्यात आले होते. पोलिस तपासात तसे निष्पन्न झाले आहे. मतीन पटेल यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पटेल यांची चौकशी होणार आहे. त्यातून नगरसेवक पटेल यांची भूमिका केवळ आश्रय देण्यापुरती मर्यादित होती की या संपूर्ण कटकारस्थानामागे त्यांचाही काही सहभाग होता, याचा शोध पोलिस घेत आहेत.

एका गुन्हेगाराला अशाप्रकारे आश्रय दिल्याने आता मतीन पटेल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. निदा खान कौसर पार्क येथील मतीन पटेल यांनी खरेदी केलेल्या घरात तीचे आई-वडील, मावशी व भाऊ यांच्यासह लपून बसली असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली. नाशिक पोलिसांनी तातडीने ही माहिती संभाजीनगर पोलिसांना कळवली. त्यानंतर नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने या परिसराची रेकी करत तिला गुरुवारी दि. ७ रात्री ताब्यात घेतलं.

निदा खानने TCS धर्मांतर प्रकरणात पीडित महिलांच्या धार्मिक भावना दुखावणे व त्यांचा ब्रेनवॉश केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. तसा गुन्हाही तिच्यावर नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे दाखल आहे. निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी आपल्या वकिलांमार्फत गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते, मात्र नाशिकरोड न्यायालयाने हे प्रकरण 'आंतरराष्ट्रीय सिंडिकेट'शी संबंधित असल्याचे सांगत तिचा जामीन फेटाळला. निदाच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, परकीय निधी आणि धर्मांतराचे जाळे उलगडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणी MIM चे नेते इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणाचे खरे सूत्रधार जलील हेच असून त्यांची चौकशी केली जावी अशी मागणी मंत्री शिरसाट यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT