sandeep gulve | uddhav Thackeray sarkaranama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Teacher Constituency : काँग्रेसचा बडा नेता ठाकरेंच्या गळाला, नाशिक शिक्षक मतदारसंघातून गुळवे मैदानात उतरणार?

Nashik Teacher Constituency Election News : नाशिक शिक्षक मतदारसंघातून चार ते पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Sampat Devgire

Nashik News, 1 June : काँग्रेस नेते संदीप गुळवे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shivsena Uddhav Thackeray ) पक्षात प्रवेश करणार आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ( Nashik Teacher Constituency election 2024 )ते संभाव्य उमेदवार आहेत.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीत गुळवे ( Sandeep Gulve ) यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली आहे. याबाबतची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

गुळवे यांनी या निवडणुकीसाठी शिक्षक लोकशाही आघाडीकडे उमेदवारी मागितली होती. माजी आमदार बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गुळवे यांना आघाडीने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, या आघाडीत मतभेद झाल्याने त्यांनी आता नगरचे भाऊसाहेब कचरे यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उमेदवारीवरून शिक्षक लोकशाही आघाडीत फूट पडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुळवे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी शुक्रवारी उमेदवारीबाबत चर्चा केली होती. महाविकास आघाडीने नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे गुळवे उमेदवारीसाठी शिवसेनेत प्रवेश करतील.

या मतदारसंघात यंदा शिक्षक आणि संस्थाचालक दोन्हीही उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी शुक्रवारी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार किशोर दराडे हे शिवसेना पुरस्कृत विद्यमान आमदार आहेत. तेही अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे कळते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चार ते पाच उमेदवार असल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT