Kumbh Mela Commissioner Shekhar Singh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : नाशिकच्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रशासन उभारणार 'ही' खास प्रणाली, एक तास आधीच अंदाज येणार

Nashik Trimbakeshwar Kumbh Mela Digital Twin Technology : नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी भाविक नाशिकमध्ये दाखल होतील. त्यामुळे वाहतूक कोंडी व चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.

Ganesh Sonawane

Nashik Trimbakeshwar Kumbh Mela Digital Twin Technology : सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्यानंतर आता प्रशासनाकडून विविध विकास कामांसह कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात जोरदार तयारी सुरु आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी भाविक नाशिक नगरीत येतील. तब्बल १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. त्यामुळे चेंगराचेंगरी टाळण्यासाठी आणि गर्दीचे अचूक नियोजन करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने अत्याधुनिक 'डिजिटल ट्विन' प्रणाली उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

या तंत्रज्ञानातून संपूर्ण कुंभमेळा क्षेत्राचे संगणकीय आभासी प्रारूप तयार होणार आहे. ते एकात्मिक नियंत्रण कक्ष आणि जीआयएस नकाशांशी जोडले जाईल. CCTV, नदीची पाणीपातळी, पाऊस, धरण विसर्ग, पार्किंग आणि बस वाहतूक यांची माहिती एकाच व्यासपीठावर दिसणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील १५ ते ६० मिनिटांतील गर्दी आणि वाहतूक कोंडीचा अंदाज या प्रणालीला येणार आहे. त्यामुळे धोका निर्माण होण्याआधीच प्रशासनाला उपाययोजना करता येतील.

१२ नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक

१२ नोव्हेंबरला कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबक नाका येथील प्राधिकरण कार्यालयात आंतर विभागीय बैठक होणार आहे. दुपारी ४ वाजता ही बैठक नियोजित आहे. या बैठकीला पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, एसटी, आरोग्य, जलसंपदा, अग्निशमन आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत.

पाच कंपन्या अंतिम फेरीत

प्राथमिक टप्प्यातील १० कंपन्यांना नाशिकची प्रत्यक्ष माहिती दिली जाणार आहे. CCTV, वाहतूक आराखडा आणि पूरस्थितीच्या आधारे १५ दिवसांत प्रारूप तयार करून प्रात्यक्षिक द्यावे लागणार आहे. प्रशासकीय समितीच्या मूल्यांकनानंतर अंतिम ५ कंपन्यांची मुख्य निविदेसाठी निवड होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT