Nashik ZP : नाशिक जिल्हा परिषदेच्या एकूण 74 गट साठी नाशिकच्या कालिदास कलामंदिर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोडत प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीमध्ये सोडत प्रक्रिया पार पडली असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आजपासून खरी सुरुवात होणार आहे.
आजच्या जिल्हा परिषद सोडत प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्यातील इच्छुकांची लक्ष लागून राहिले होते. ३७ गट हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यामध्ये १० ओबीसी महिला प्रवर्गासाठी, सर्वसाधारण ९, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी १५ आणि अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी ३ गट आरक्षित झाले आहेत.
७४ पैकी तब्बल ३७ गट महिलांसाठी आरक्षित झाले. म्हणजे ५० टक्के महिला आरक्षण प्रत्यक्षात दिसतंय. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता महिला नेतृत्व विकसित करण्यावर आणि स्थानिक महिला कार्यकर्त्यांना पुढे आणण्यावर भर देतील. म्हणजेच यातून ग्रामीण व मागास समाजातील महिला नेतृत्व पुढे येणार आहे. अनेक इच्छुक पुरुष पुढाऱ्यांना यातून मोठा धक्का बसला असून अनेक ठिकाणी थांबून घ्यावे लागणार आहे. आता कुटुंबातील महिला नेतृत्वाला पुढे करावे लागेल.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) एकूण १९ जागा
कसबे सुकेणे (निफाड) –
कळवाडी (मालेगाव) – (म).
नांदूर शिंगोटे (सिन्नर) –
साकोरी निंबायती (मालेगाव) – (म).
पळसे (नाशिक) –
उगाव (निफाड) – (म)
सोमठाणे (सिन्नर) –
ब्राम्हणगाव (बागलाण) – (म).
चांदोरी (निफाड) – (म).
दाभाडी (मालेगाव) –
ठेंगोडे (बागलाण) – (म).
खाकुर्डी (मालेगाव) – (म).
सायखेडा (निफाड) – (म)
वडाळीभाई (चांदवड) –
पाटोदा (येवला) –
दापूर (सिन्नर) – (म).
जायखेडा (बागलाण) –
माळेगाव (सिन्नर) –
तळेगाव रोही (चांदवड) – (म).
अनुसूचित जाती – एकूण ०५ जागा
एकलहरे (महिला)
राजापूर (महिला)
लासलगाव (महिला)
रावळगाळ (पुरूष).
दुगाव (पुरूष)
अनुसूचित जमाती – एकूण २९ जागा
आंबे
कोहोर (म)
ठाणापाडा (म).
कनाशी (म)
कोचरगाव
अहिवंतवाडी
कळवण मानूर (म)
हरसूल
हातगड
सूरगाणा – ठाणगाव (म)
त्रिभूवन (म)
उंबरठाण (म)
खंबाळे
अभोणा (म)
ताहराबाद (म).
वडनेर भैरव (म)
अंजनेरी
पुनदनगर, कळवण (म)
गिरणारे
धामणगाव
विरगाव (पु)
विल्होळी (म)
उमराळे
कसबे वणी
नांदगाव सदो (म).
उंबरठाण
वाडीवऱ्हे
खेडगाव (म)
मोहाडी
बागलाण मानूर (म)
सर्वसाधारण – एकूण २१ जागा
नामपूर – (म)
झोडगे – (म)
सौंदाणे –
निमगाव
लोहणेर
उमराणे (म).
खर्डे वा.
धोडांबे (म)
साकोरा (म)
न्यायडोंगरी
भालूर
जातेगाव (म) नांदगाव
नगरसूल
अंदरसूल (म)
मुखेड
पालखेड
विंचूर (म)
नांदूर मध्यमेश्वर
घोटी बु.
मुसळगाव (म)
ठाणगाव
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.