सिडको : नाशिक (Nashik) शहराच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन व कृती राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षानेच केली आहे. त्यामुळे शहराचे चित्र बदलून सामान्यांना त्याचा लाभ होत आहे, असे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे (Dr. Apurva Hirey) म्हणाले.
‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमाअंतर्गत माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रभाग क्रमांक ३७ मधील सुवर्णकार समाज मंगल कार्यालयात बैठक पार पडली.
या वेळी डॉ. हिरे म्हणाले, की नाशिक शहराचा विकास खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उड्डाणपूल उभारत नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडविली. ओझर येथे विमानतळ उभारल्यामुळे नाशिक शहरात विविध व्यावसायिक गुंतवणुकीस तयार होऊ शकतील. ही दूरदृष्टी ठेवून विमानतळाचे काम पूर्णत्वास नेले. नाशिक शहरातील सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत (कै.) लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या प्रयत्नांमुळेच निर्माण झाली. सिडको प्रकल्पाची मंजुरी (कै.) डॉ.बळिराम हिरे यांच्या प्रयत्नांमुळे झाली.
माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतलेले असतानाही एकही नवीन प्रकल्प नाशिक शहरात आणण्यात भाजप यशस्वी ठरले नाही. प्रत्येक चौकाचौकात प्रत्येक घराघरांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम, पक्षातील ध्येय-धोरणे, पोहचविण्याचे व पक्ष बळकटीकरण करण्याचे आवाहन हिरे यांनी केले.
या वेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विशाल डोखे, डॉ. योगिता हिरे, सोनाली ठाकरे, दीपक सोनवणे, किरण शिंदे, धनंजय बुचडे, जिभाऊ बच्छाव, साहेबराव धोंडगे, दिलीप तुपे, भय्या पवार, संतोष हरगोडे, मदन जमदाडे, दिनेश ठाकरे, अंकुश वराडे, सुनील खैरनार, रमाकांत देसले, भास्कर साळुंखे, गजू परदेशी, दीपक खैरनार उपस्थित होते.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.