Dr. Bharti Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे देश सशक्त बनला!

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत देवळा येथे भाजपचे संमेलन

Sampat Devgire

देवळा : सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने (centre Government) आठ वर्षांत विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nrendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारत देश सशक्ततेच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी केले. (BJP government`s policy is for poor and needy)

येथील डॉ. दौलतराव आहेर सभागृहात झालेल्या भाजपच्या ‘सेवा, सुशासन, गरीब कल्याण संमेलन’ व देवळा तालुक्यातील जलजीवन मिशनांतर्गत विविध पाणीयोजनांच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. आमदार डॉ. राहुल आहेर अध्यक्षस्थानी होते.

आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, की केंद्र सरकार शेतकरी व जनतेसाठी समर्पित भावनेने काम करीत असले, तरी राज्य सरकारकडे सहकार्याची भावना नाही. कांद्यांसाठी अनुदान, म्हणून केंद्र सरकारने मंजुरी दिली. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीच्या नाकर्त्या सरकारने अद्याप केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला नाही. राज्य शासन केंद्र सरकारच्या नावाने खडे फोडण्यात धन्यता मानत आहे. मात्र, या मागची सत्यता ते लपवीत आहेत. कांदा निर्यात सुरू असताना, विरोधक केंद्र सरकारची बदनामी करीत आहेत.

यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी, कांदा भाववाढीसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न व्हावेत, तसेच जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच जनता दरबार घेण्यात यावा, अशी मागणी केली.

केंद्र सरकार विकासाचे धोरण राबवीत असताना, राज्य सरकार आडकाठी आणत असल्याचा आरोप आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केला. यावेळी रवी अनासपुरे व माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली. भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. तालुक्यात विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध करीत आदर्श ठेवल्याबद्दल तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित संचालकांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, विकास देशमुख, नितीन पांडे, नंदकुमार खैरनार, तरंग गुजराथी, कळवणचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, नाशिक तालुकाध्यक्ष नितीन गायकर, दिंडोरी तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, नांदगाव तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, दिशांत देवरे, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, देवळाच्या नगराध्यक्षा भारती आहेर, उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर व नगरसेवक उपस्थित होते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT